Prateek gandhi Actor Mahatma Gandhi  esakal
मनोरंजन

प्रतिक गांधी साकारणार 'महात्मा गांधी', रामचंद्र गुहांच्या पुस्तकावर वेब सीरिज

बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक हंसल मेहता दिग्दर्शित स्कॅम 1992 मधून एका अभिनेत्यानं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक हंसल मेहता दिग्दर्शित स्कॅम 1992 मधून एका अभिनेत्यानं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. प्रतिक गांधी (Bollywood Actor) असे त्या अभिनेत्याचे नाव हर्षद मेहता ही व्यक्तिरेखा त्यानं साकारली होती. ही भूमिका एवढी गाजली की, प्रतिक गांधी हे नाव अनेकांच्या (Scam 1992) तोंडी आलं. त्यानं अतिशय प्रभावीपणे ही भूमिका साकारली होती. आता तो देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आयुष्यावरील आधारित बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार आहे. त्याची जोरदार चर्चाही सुरु झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिकच्या त्या चित्रपटाच्या तयारीविषयीची एक पोस्ट व्हायरल झाली होती. अप्लॉज इंटरटेन्मेंटच्या वतीनं या बायोपिकची निर्मिती केली जाणार आहे.

प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या दोन पुस्तकांवर आधारित ही मालिक असणार आहे. इंडिया बिफोर गांधी आणि इंडिया आफ्टर गांधी असे त्या पुस्तकाचे नाव आहे. प्रतिकविषयी सांगायचे झाल्यास त्यानं यापूर्वी हंसल मेहता यांच्या स्कॅम 1992 वेबसीरीजमध्ये काम केले होते. ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियही झाली होती. त्या मालिकेचे कथानक, संवाद, दिग्दर्शन यामुळे ती अजुनही भारतातील सर्वोत्तम वेबसीरिजपैकी एक मानली जाते. सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेनं त्या ओटीटी प्लॅटफॉर्मला देखील मोठं यश मिळवून दिल्याचे दिसून आले. थिएटर आर्टिस्ट म्हणून पुढे आलेल्या प्रतिकनं यापूर्वी एका चित्रपटामध्ये देखील भूमिका केली होती. आपल्या प्रभावी अभिनयानं त्यानं प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. आता तो गांधींजींच्या आयुष्यावर तयार कऱण्यात येणाऱ्या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आपल्या नव्या प्रोजेक्टविषयी अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यानं लिहिलं आहे की, महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित मालिकेतून एका वेगळ्या रुपात येण्यासाठी तयार आहे. प्रख्यात लेखक रामचंद्र गुहा यांच्या प्रसिद्ध पुस्तकांवर आधारित ही मालिका आहे. या नवीन प्रवासासाठी मी फारच उत्सुक आहे. असं सांगितलं जातं की, गुहा यांच्या गांधी बिफोर इंडिया आणि गांधी द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड या दोन पुस्तकांवर आधारित ही सीरिज असणार आहे. आपण थिएटर करत असल्यापासून एकदा तरी आपल्याला गांधीजींची भूमिका करायला मिळावी. असं स्वप्न होतं, ते आता सत्यात येणार आहे. असंही प्रतिकनं यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT