jay shree ram, prathamesh parab, prathamesh parab new movie SAKAL
मनोरंजन

Prathamesh Parab: प्रथमेश परबने लगावला 'जय श्रीराम'चा नारा, नेमकं काय आहे प्रकरण?

प्रथमेश परबने आजवर बालक पालक, टाइमपास, टकाटक असे अनेक सिनेमे केले

Devendra Jadhav

Prathamesh Parab News: प्रथमेश परब हा मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात काम करणारा हरहुन्नरी कलाकार. प्रथमेश परब आजवर टाईमपास करत मराठी मनोरंजन विश्वात टकाटक काम करतोय.

आज असलेल्या रामनवमीच्या मुहूर्तावर प्रथमेशने जय श्रीरामचा नारा दिलाय.प्रथमेशने अचानक जय श्रीरामचा नारा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय आहे नेमकं प्रकरण बघूया..

(Prathamesh Parab new movie jay shree ram shooting starts soon)

आज रामनवमीच्या मुहुर्तावर प्रथमेशच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय. सागर पाठक लिखित "जय श्रीराम" या नवीन चित्रपटाचे क्लॅप पूजन मनसे सरचिटणीस श्री अमेयजी खोपकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मनसे चित्रपटसेना उपाध्यक्ष रमेश परदेशी, प्रथमेश परब, अमोल कागणे, शरद पाटील, चेतन चावडा, आनंद कुंदूर, चेतन धोत्रे, निखिल यादव, शहाजी गोरे, श्री झुरंगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रथमेश परब या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा ५ जानेवारी २०२३ ला रिलीज होण्याची शक्यता आहे.

या सिनेमात प्रथमेश परब सोबत आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

काही दिवसांपूर्वी प्रथमेश परब प्रथमेशने गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर सोबतच व्हिडिओ शेयर केलाय.

क्षितिजाला शुभेच्छा देताना प्रथमेश लिहिलं कि.. 'निरागसता', तुझं सौंदर्य, अशीच हसरी जगत रहा, कधी शहाणपण - कधी लहानपण, निखळ निर्मळ वागत रहा !!

अशा रोमँटीक शब्दात प्रथमेशने क्षितिजाला शुभेच्छा दिल्या होत्या. प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा सोबतचं नातं सर्वांसमोर उघड केलंय.

प्रथमेशची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर हि बायोटेक्नोलॉजिस्ट आहे. याशिवाय ती लेखिका आहे. ती एक NGO सुद्धा चालवते.

क्षितिजा आणि प्रथमेश गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. परंतु काही महिन्यांपूर्वी या दोघांनी रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं.

अभिनेता प्रथमेश परब याने आजवर बालक पालक, टाइमपास, टकाटक असे अनेक सिनेमे केले पण प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला तो 'टाइमपास' मधला दगडू.

नुकताच या चित्रपटाचा तिसरा भाग येऊन गेला, ज्यामध्ये दगडू आणि प्राजक्ता नाही तर पालवीची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT