baloch , baloch film, pravin tarde
baloch , baloch film, pravin tarde SAKAL
मनोरंजन

Pravin Tarde Baloch: पानिपतच्या पराभवानंतरचं भयाण वास्तव.. प्रवीण तरडेंचा नवीन सिनेमा 'बलोच'

Devendra Jadhav

Pravin Tarde New Movie: अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे कायमच नवनवीन भूमिकांमधुन त्यांच्या फॅन्सना सरप्राईज देत असतात. आता प्रवीण तरडे नव्या ऐतिहासिक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या 'बलोच' सिनेमाची अनेकांना उत्सुकता लागली आहे. पोस्टरमधील प्रवीण तरडे यांचे रौद्र रूप विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या नजरेतून क्रोध व्यक्त होत आहे.

'बलोच'च्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळणार आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे.

प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शित 'बलोच' या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून सोबतच 'बलोच'च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. येत्या ५ मे रोजी 'बलोच' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत आहेत.

आजवर देशांसाठी लढलेल्या अनेक वीर मराठ्यांची कहाणी, लढाई आपण पडद्यावर पाहिली. अशीच इतिहासातील लक्षात राहणारी लढाई म्हणजे पानिपतची. पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा 'प्रेक्षकांना 'बलोच'मध्ये पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा प्रकाश जनार्दन पवार यांचीच असून महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्माते आहेत तर पल्लवी विठ्ठल बंडगर, दत्ता काळे, सुधीर वाघोले, विजय अल्दार, सहनिर्माते आहेत. प्रवीण तरडे यांच्या या नव्या ऐतिहासिक सिनेमाची त्यांचे फॅन्स वाट बघत आहेत.

प्रवीण तरडे यांचा २०२२ मध्ये आलेला धर्मवीर सिनेमा प्रचंड गाजला. प्रवीण तरडे शेवटी सरसेनापती हंबीरराव या सिनेमात हंबीरमामांच्या भूमिकेत दिसले. याशिवाय वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांच्या रांगड्या ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहेत. बलोच च्या माध्यमातून प्रवीण तरडे त्यांच्या अभिनयाची काय जादू दाखवणार याची उत्कंठा शिगेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT