pravin tarde says we use very expensive horse for  sarsenapati hambirrao movie
pravin tarde says we use very expensive horse for sarsenapati hambirrao movie  SAKAL
मनोरंजन

Pravin Tarde Birthday: 'कलाकारांपेक्षा घोडीच महाग..' प्रवीण तरडेंनी सांगितला भन्नाट किस्सा

नीलेश अडसूळ

आज प्रवीण तरडेंचा वाढदिवस. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक भन्नाट किस्सा..

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ (sarsenapati hambirao) चित्रपट २७ मे २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा स्वराज्याचे सरसेनापती अशी ख्याती असलेल्या हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यानिमित्ताने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे (pravin tarde) यांनी चित्रीकरणादरम्यानचा एक भन्नाट किस्सा सांगितला. (pravin tarde interview)

तरडे म्हणाले, ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट हा मराठीमधील सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. ऐतिहासिक सिनेमांचा बजेट हाच हिरो असतो. आम्ही जे या चित्रपटासाठी घोडे वापरले त्यांचा दिवसाचा खर्च हा कलाकारांच्या मानधनापेक्षा अधिक होता. मुंबईवरुन हे घोडे एसी ट्रकमध्ये सेटवर यायचे. घोड्याचा सीन शूट करून झाला की पुन्हा तो एसी ट्रकमध्ये जायचे.”

(pravin tarde on sarsenapati hambirrao movie )

पुढे ते म्हणाले, 'अजय देवगणने ‘तानाजी’ चित्रपटासाठी जी घोडी वापरली तिच मी या चित्रपटासाठी वापरली. रोल साऊंड असं घोडीने ऐकलं की ती तयार होते आणि एक्शन म्हटलं की पळते. घोडीबरोबर असणारा माणूस तिच्या कानात जाऊन सगळ्या सूचना देतो. कट म्हटलं की ही घोडी लगेच थांबते. आपल्याकडे काही कलाकारांना कट म्हटलं की थांबायचं असतं हे अजूनही कळत नाही. पण घोडी मात्र कट शब्द ऐकताच थांबते. घोडीचं डाएट देखील वेगळं होतं. मोठ्या गोष्टी करायच्या म्हंटलं की खर्च होतोच.' असा किस्सा त्यांनी रंगवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT