pravin tarde : लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री अशी बहू ख्याती असलेले प्रवीण तरडे म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळे 'मुळशी पॅटर्न' असो 'धर्मवीर' किंवा 'हंबीरराव' प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. विशेष म्हणजे आपली संस्कृती, परंपरा याविषयी ते भरभरून बोलत असतात. त्यांचे आपल्या गावावर, शेतीवर विशेष प्रेम आहे हेही त्यांच्या पोस्ट मधून दिसून आले आहे. पण आज त्यांनी स्वतःचा फोटो पोस्ट करत एक प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न आहे की आगामी चित्रपट अशी चर्चा आता या पोस्ट नंतर सुरू झाली आहे. (pravin tarde shared post about annabhau sathe fakira kadambari he asks to netizens he looks like fakira or not)
प्रवीण तरडे यांनी आपला एक जुना फोटो शेअर करत त्यालाए क कॅप्शन दिले आहे. ते म्हणतात, ‘अण्णाभाऊंचा फकिरा असाच दिसत असेल?' त्यांचा हा प्रश्न प्रचंड सूचक आहे. त्यामुळे अनेकांनी यावर कमेंट करून होकार दर्शवला आहे ते अनेकांनी थेट चित्रपट येणार असा अंदाज वर्तवला आहे. ‘फकिरा साकारायची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यात आहे’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
‘फकिरा’ ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. या कांदबरीत ‘फकिरा’ नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा ‘फकिरा’ आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी उत्तम अशी ही कादंबरी आहे. या कादंबरीचा चाहतावर्ग मोठा असल्याने प्रवीणचा हा प्रश्न केवळ प्रश्न होता की चित्रपटाची तयारी असेही अनेकांना वाटत आहे. काहींनी तर फकिरा’ या व्यक्तिरेखेवर चित्रपट बनवा अशी विनंती प्रवीण तरडे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे 'फकिरा'ची अधिकृत घोषणा कधी होणार उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.