Preity Zinta Esakal
मनोरंजन

Preity Zinta: भारतातील 'या' मंदिराशी आहे प्रिती झिंटाच्या बालपणीचं खास कनेक्शन.. पती आणि मुलासोबत पोहोचली दर्शनासाठी

सध्या प्रिती झिंटा आयपीएलच्या धावपळीतून बाहेर येत हिमाचल प्रदेशची भटकंती करताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Preity Zinta: बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या भारतात आली आहेत प्रीती आयपीएल २०२३ मध्ये आपली टीम पंजाब किंग्स इलेव्हनसाठी जोरदार चिअर करताना दिसली. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आपला पती आणि मुलांसोबत शिमल्याला गेली होती आणि तिथे तिनं माता हाटेश्वरी मंदिरात जाऊन साग्रसंगीत पूजा केली.

प्रीतीनं याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओत प्रीती झिंटाचा पती जीन गुडइनफ आणि मुलं जय-जिया सगळं कुटुंब दिसत आहे.(Preity Zinta Himachal Hateshwari mata temple hatkoti visit with husband and children video viral)

व्हिडीओमध्ये प्रीती झिंटा पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून एकदम सिंपल लूकमध्ये दिसत आहे. प्रीतीनं डोक्यावर ओढणी घेतली आहे. अभिनेत्रीचा ट्रेडिशनल अंदाज चाहत्यांना पसंत आला आहे. तर तिचा पती जीन ब्लॅक पॅंट आणि टी-शर्ट परिधान करुन दिसत आहे. प्राती आणि जीन यांनी आपल्या दोन्ही मुलांना उचलून घेतलं आहे. मुलांसोबत प्रीतीनं मंदिरात पूजा देखील केली.

प्रीती झिंटानं व्हिडीओ शेअर करत एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की-''जेव्हा मी छोटी होते तेव्हा नेहमी हिमाचल प्रदेशमधील शिमल्याच्या हाटकोटी इथल्या हाटेश्वरी मंदिरात जायचे. मी कायम या मंदिराशी माझ्या एका खास कनेक्शनचा अनुभव करत आलेय.

माझ्या बालपणात या मंदिराची खास भूमिका राहिली आहे. आता मी एक आई आहे आणि माझी मुलं पहिल्यांदा अशा प्राचीन मंदिरात आली आहेत. अर्थात ते खूपच लहान असल्यामुळे त्यांना आमची ही ट्रीप लक्षात राहणार नाही पण म्हणून मी पुन्हा त्यांना इथे घेऊन येईन''.

तुम्हाला माहितीसाठी सांगतो की प्रीती झिंटा गेल्या काही काळापासून सिनेमापासून दूर आहे. सध्या अभिनेत्री पंजाब किंग्स इलेव्हन या आपल्या आयपीएल टीममध्ये को-ओनर म्हणून जोरदार सक्रिय दिसली.

प्रीती कॅरेबियन लीगमध्ये सेंट लूसिया किंग्स टीमची मालकीण आहे आणि तिच्याजवळ साऊथ आफ्रिकेच्या मजांसी सुपर लीगच्या स्टेलनबॉश किंग्सचा मालकी हिस्सा देखील आहे. लग्नानंतर प्रीति अमेरिकेच्या लॉस एंजेलिमध्ये राहते आहे आणि तिला जय-जिया ही दोन जुळी मुलं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ला हटवून शुभमन गिलला वनडे संघाचा कर्णधार का केलं? अजित आगरकरने खरं कारण सांगितलं

TRPमध्ये मोठी उलथापालथ! दुसऱ्या स्थानावर घसरण्यापासून थोडक्यात वाचली सायली; टॉप १० मध्ये नव्या मालिकेची एंट्री; वाचा रिपोर्ट

Chandrakant Patil : संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार, चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या आदीच केली घोषणा

Nashik News : सिडकोत 'बॅनर हटाव' मोहीम! नवीन नाशिक महापालिकेची धडक कारवाई; शहराचे विद्रूपीकरण थांबवण्यास सुरुवात

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी न्यायालयीन सुनावणीनंतर तुरुंगात

SCROLL FOR NEXT