Adah Sharma Birthday: अदा शर्माला केसांमुळे करावा लागलाय रिजेक्शनचा सामना, ऑडिशननंतर सांगितलं जायचं,'तुझे केस खूपच..'

'द केरळ स्टोरी' या सिनेमातील भूमिकेमुळे सध्या अदा शर्मा जोरदार चर्चेत आहे.
Adah Sharma Birthday
Adah Sharma BirthdayEsakal

Adah Sharma Birthday: 'द केरळ स्टोरी' सिनेमामुळे चर्चेत आलेली अदा शर्मा आज ११ मे रोजी आपला वाढजदिवस साजरा करीत आहे. आज गुरुवारी अदा ३० वर्षाची झाली आहे. अदानं हिंदी व्यतिरिक्त तेलुगू,तामिळ सिनेमातूनही काम केलं आहे. अदाचा जन्म तामिळ ब्राह्मण कुटुंबात झाला आहे, तिचे वडील इंडियन मर्चंट नेवीत कॅप्टन होते आणि आई क्लासिकल डान्सर आहे.

अदा जेव्हा तीन वर्षांची होती तेव्हापासूनच तिनं नृत्य शिकण्यास सुरुवात केली होती. ती जिमनॅस्ट देखील आहे. तिनं दहावीत असतानाच अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीच तिनं शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला पण आईवडीलांच्या सांगण्यावरून तिनं १२वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर आपलं नशिब आजमवायला इंडस्ट्रीत पोहोचली.

अदानं बान्द्याच्या ऑक्सिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. (Adah Sharma Birthday, Actress rejected by casting directors)

Adah Sharma Birthday
The Kerala Story च्या दिग्दर्शकाचा हैराण करणारा खुलासा,म्हणाले,'हा सिनेमा पाहून एका मुलानं केला माफीचा मेसेज..'

अदा शर्मा जिमनॅस्ट देखील आहे. तिनं मुंबईत नटराज गोपी कृष्ण कथक डान्स अकादमीतून कथकमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. जॅझ आणि बेली व्यतिरिक्त तिनं अमेरिकेत चार महिन्यांसाठी साल्साचं शिक्षण घेतलं आहे. अदा बेली डान्समध्ये आपण एक्सपर्ट असल्याचा दावा नेहमीच करत आली आहे. अदाला इंग्लिश आणि हिंदी व्यतिरिक्त मराठी देखील बोलता येते,कारण अदा मुंबईत वाढलेली आहे.

Adah Sharma Birthday
Madhuri Dixit: गुलजार नार ही मधुबाला..

अदा जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा प्रयत्न करत होती,तेव्हा तिनं अनेक भूमिकांसाठी ऑडिशन दिल्या पण तिच्या कुरळ्या केसांमुळे तिला रिजेक्शनचा सामना करावा लागला. अनेक कास्टिंग डायरेक्टर्सना वाटलं की ती अशा केसांमुळे खूपच लहान दिसते म्हणून देखील तिला रिजेक्ट केलं गेलं. अखेर दिग्दर्शक विक्रम भट्टचा सिनेमा '१९२०' मध्ये तिला संधी मिळाली आणि तिचा पहिलाच सिनेमा सुपरहिट राहिला. तिच्या परफॉर्मन्सचं खूप कौतूक केलं गेलं. तिला फिल्मफेअरमध्ये बेस्ट फिमेल डेब्यूचं नॉमिनेशन मिळालं.

यानंतर तीन वर्षांनी अदाचा आणखी एक हॉरर सिनेमा 'फिर' रिलीज झाला पण तो सिनेमा फ्लॉप झाला. तिचा तिसरा सिनेमा 'हम है राही कार के' भी पुरता आपटला, २०१४ मध्ये आलेल्या 'हार्टअटॅक' या तेलुगु सिनेमातून तिनं साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केलं. आणि त्याच वर्षाी 'हंसी तो फंसी' या सिनेमात ती सहकलाकारच्या भूमिकेत दिसली होती.

यानंतर तिचे अनेक तामिळ सिनेमे देखील रिलीज झाले. आता ५ मे २०२३ रोजी रिलीज झालेल्या 'द करेळ स्टोरी' सिनेमातील तिच्या भूमिकेचं खूप कौतूक केलं जात आहे.

Adah Sharma Birthday
Mrunal Thakur: 'ठेच लागली जाता जाता..बाई माझी जोडवी टचकली..'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com