Preity Zinta Father In Law: Esakal
मनोरंजन

Preity Zinta Father In Law: प्रीती झिंटावर कोसळला दु:खाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीचं निधन; पोस्ट व्हायरल...

प्रीतीशी संबंधित एक दुःखद बातमी समोर आली आहे. तिच्या सासऱ्यांचे निधन झाले आहे. प्रितीने सोशल मीडियावर ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Vaishali Patil

Preity Zinta Father In Law Death: अभिनेत्री प्रीती झिंटा आता बॉलीवूडमध्ये फारशी सक्रिय नाही. तरी ती सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत असते. त्यामुळे तिची चर्चा होत असते.

मात्र आता प्रीतीशी संबंधित एक दुःखद बातमी समोर आली आहे. तिच्या सासऱ्यांचे निधन झाले आहे. प्रितीने सोशल मीडियावर ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सासऱ्यांसोबतचा एक फोटो शेयर करत तिने एक इमोशनल पोस्ट शेयर केली आहे. त्यात ती लिहिते की, “प्रिय जॉन, मला तुझी तळमळ, दयाळूपणा आणि सर्वात महत्त्वाचा तुझा शहाणपण आठवेल. तुझ्यासोबत शूट करायला जायला, तुझे आवडते भारतीय पदार्थ बनवायला आणि तूझ्यासोबत गप्पा मारायला मला खूप आवडायचं. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी तुमचं घर आणि हृदयाचे दरवाजे उघडल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमच्याशिवाय ईस्ट कोस्ट पूर्वीसारखा राहणार नाही. तुमच्या आत्म्याला शांती लाभो."

90 च्या दशकात चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रीतीने 1998 मध्ये 'दिल से' मधून पदार्पण केले. 2008 मध्ये कॅनेडियन चित्रपट 'हेवन ऑन अर्थ' मध्ये काम केल्यानंतर तिने चित्रपटांमधून दोन वर्षांचा ब्रेक घेतला.

तिने 2016 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये जीन गुडइनफशी लग्न केले. लग्नानंतर प्रीती लॉस एंजेलिसमध्ये राहायला गेली. 2021 मध्ये, हे जोडपे सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT