prithviraj chavhan sakal
मनोरंजन

KBC मध्ये 'पृथ्वीराज चव्हाण' उत्तर दिलं अन् जिंकले 'इतके' लाख

भोपाळच्या समीक्षाने कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमात 'पृथ्वीराज चव्हाण' उत्तर दिलं अन् 1.60 लाख रुपये जिंकले आहे.

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड (सातारा) : 'कोन बनेगा करोडपती' (KBC) या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavhan) यांच्यावर प्रश्न विचारला गेला. कार्यक्रमाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. दूरचित्र वाहिनीवर कार्यक्रमाचे आतापर्यंत १३ सिझन झालेले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या खास शैलीमुळे हा कार्यक्रम घरा-घरात पोहचला आहे.

सद्या सुरु असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर एक प्रश्न विचारला गेला. हा प्रश्न खेळत होत्या मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरातील समीक्षा श्रीवास्तव यांना १ लाख ६० हजार रकमेसाठी एक प्रश्न अमिताभ बच्चन यांनी विचारला होता कि, महाराष्ट्राच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांचे एरोस्पेस इंजिनिअरिंग शिक्षण झालेले आहे.

यामध्ये ४ पर्याय समीक्षा यांना देण्यात आले होते. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अब्दुल रहमान अंतुले, यशवंतराव चव्हाण या चार पर्यायांपैकी पृथ्वीराज चव्हाण हे बरोबर उत्तर समीक्षा यांनी तत्ज्ञांच्या मदतीने दिले व त्यांनी १ लाख ६० हजार रुपये इतकी धनराशी जिंकली.

आपल्या कराडसाठी हि अत्यंत अभिमानस्पद गोष्ट आहे कि, कराडच्या उच्चशिक्षित नेतृत्वाच्या शिक्षणाची दखल देशाचा लोकप्रिय कार्यक्रम कोन बनेगा करोडपती मध्ये घेतली गेली. पृथ्वीराज चव्हाण स्वच्छ प्रतिमेसोबतच उच्च शिक्षित म्हणून सुद्धा त्यांची ओळख देशभर व जगभर आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील प्रश्नाचे उत्तर समीक्षा यांनी दिल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री अमिताभ बच्चन यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिक्षणाची माहिती यावेळी सर्व प्रेक्षकांना दिली.

ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी बर्कले येथील युनिव्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया येथून एम एस ची डिग्री घेण्याआधी आपल्या देशातील राजस्थानमधील नावाजलेले बिर्ला इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी अँड सायन्स म्हणजेच बिट्स पिलानी मधून इंजिनिरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ना तारण, ना जामीनदार द्यावा लागणार, तरी बॅंकेतून मिळणार २५ लाखांपर्यंत कर्ज, कोणती आहे योजना? वाचा...

सोलापुरात कांद्याच्या भावात २५० रुपयांची घसरण! तीन दिवसांत १२४५ गाड्या आवक; आता प्रतिक्विंटल १२५० ते ३३०० रुपयांपर्यंत दर

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या किडनी विक्रीतील एजंट सोलापूरचा; मोबाईल लोकेशनवरुन कृष्णा सोलापुरात पकडला; अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या कृष्णाने नावापुढे लावली डॉक्टरची पदवी

Morning Breakfast Recipe: नेहमीचेच पोहे बनवण्यापेक्षा, एकदा असेही बनवून पाहा, सर्वजण करतील कौतुक, लेगच लिहून घ्या रेसिपी

त्वचेचे आजार व आतड्यांचे आरोग्य

SCROLL FOR NEXT