Priya Bapat,Umesh Kamat,Emraan Hashmi,Vidya Balan Google
मनोरंजन

प्रिया-उमेशचा 'घनचक्कर' ड्रामा!

सोशल मीडियावर दोघांच्या डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल...

प्रणाली मोरे

प्रिया बापट(Priya Bapat) आणि उमेश कामत(Umesh Kamat) हे दोघेही मराठी सिनेइंडस्ट्रीतले लव्हबर्ड्स म्हणून प्रसिद्ध जोडपं. आज अनेक वर्षानंतरही या दोघांची नवरा-बायको म्हणून केमिस्ट्री नेहमीच वाढताना दिसलीय. दोघेही आपापल्या कामात बिझी असतील तरी वेळ मिळाला की एकमेकांसोबत फोटो काढणं,फोटोशूट करणं,सोशल मीडियावर एकत्र व्यायाम करायचे किंवा डान्स करायचे व्हिडीओ शेअर करणं सुरू असतं. काही दिवसांपूर्वी प्रियानं उमेशसोबतचा 'जुगनू' डान्स सोशल मीडियावर शेअर केला अनं काही तासातच तो व्हायरल झाला.

प्रिया थोडी बोल्ड असली तरी उमेश मात्र थोडा बुजरा. अर्थात तो नेहमीच 'बॉय नेक्स्ट डोअर' कॅटेगरीत फीट बसणारा. नुकताच प्रियानं विद्या बालन आणि इम्रान हाश्मीच्या घनचक्कर सिनेमातलं 'लेझी लेड' गाण्यावर उमेशसोबत डान्स करीत एक धम्माल डान्स शेअर केलाय. यात दोघांनीही ट्रेडिशनल अटायर घातलेला दिसतोय. तर गाण्याच्या तालावर ठेका धरत मस्त डान्सही केलाय.

'लेझी लेड' हे गाणं खरंतर प्रत्येक बायकोने नव-यासाठी गायलंच पाहिजे असे गाणं. घनचक्कर चित्रपटाचं प्रमोशन करतानाही त्यावेळी 'लेझी हडबंड अॅन्ड क्रेझी वाईफ' असं एक प्रमोशनल कॅप्शन वापरण्यात आलं होतं. प्रिया आणि उमेशनंही डान्स करताना काहीसे असेच हावभाव केल्याचं दिसत आहे. ज्यात उमेश थोडा लेझी आणि प्रियाचा फुल क्रेझी डान्स पहायला मिळत आहे.

उमेश आणि प्रियानं अनेक सिनेमात,नाटकात,वेबसिरीजमध्ये एकत्र काम केलंय. त्यातील 'टाइमप्लीज' हा सिनेमा आणि 'आणि काय हवं?' या दोन्ही सिरीजमध्ये नवरा-बायकोची भुमिका केली आहे. यातील त्यांची केमिस्ट्री इतकी भन्नाट होती की प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd T20I : ११ महिन्यांनी आला अन् चमकला! हार्दिक, जसप्रीत, हर्षितसह न्यूझीलंडवर 'तो' भारी पडला; वर्ल्ड कपसाठी दावा ठोकला

Pune News : गर्दीतून पुढे येत मयूरने वाचवला जीव; फीट आलेल्या व्यक्तीला दिली तातडीची मदत

Latest Marathi news Live Update : जम्मू -काश्मीरमधील राजौरीतील सुंदरबनी येथे गंजलेली एके-४७ रायफल सापडली

कर्तव्यपथावर देशभक्तीचा जल्लोष! प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा कसा असेल? यावर्षीची थीम काय? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे राष्ट्राला संबोधन- "युवा पिढी देशाच्या बहुआयामी विकासाला दिशा देत आहे"

SCROLL FOR NEXT