मनोरंजन

चर्चांनंतर स्वानंदीने डिलिट केला 'तो' फोटो; आता प्रिया बेर्डेंनी दिला खुलासा

स्वाती वेमूल

मुंबई: दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी सोशल मीडियावर विशेष चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे तिने तिच्या मित्रासोबत पोस्ट केलेला फोटो. स्वानंदीने तिचा मित्र प्रेम मोदीसोबतचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आणि त्यानंतर या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगू लागली. या चर्चांवर संताप व्यक्त करत स्वानंदीने तो फोटो डिलिट केला. आता या संपूर्ण प्रकरणावर प्रिया बेर्डेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"स्वानंदी आणि प्रेम यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. नुकताच प्रेमचा वाढदिवस पार पडला. यानिमित्त स्वानंदीने त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. प्रेमचे कुटुंबीय आणि आमच्यात खूप चांगले संबंध आहेत", असं त्या 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या. 

प्रेम मोदीसोबतचा फोटो पोस्ट करत स्वानंदीने लिहिलं होतं, 'तुझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासाठी मी काहीही करु शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण एकमेकांना साथ दिली आणि एकमेकांच्या अधिक जवळ आलो. आता मला तुझी इतकी सवय झाली आहे की एकटं राहायला भीती वाटते. खूप प्रेम.’ तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर स्वानंदीने फोटो डिलिट करत स्पष्ट केलं की, 'कृपया खोट्या बातम्या पसरवू नका. माझं खासगी आयुष्य मी सगळ्यांसमोर ठेवू इच्छिते पण मला त्याबाबतीत कोणतेही गैरसमज नकोय.'

स्वानंदी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून विविध फोटो व व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. भाऊ अभिनयप्रमाणेच स्वानंदीसुद्धा लवकरच अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

priya berde reaction on daughter swanandi berde affair rumours with prem modi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

T20 World Cup तोंडावर असताना कर्णधारच बदलला! यजमान देशाच्या संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर

नशीब असावं तर असं! 'या' कंपनीच्या २० वर्षे जुन्या AC मध्ये ग्राहकांना सापडतंय सोनं, प्रकरण वाचून थक्क व्हाल!

Crime: मेव्हणीनं दाजीला तिची समस्या सांगितली; नंतर दोघांनी भयंकर कट रचला अन् एकाचा जीव गेला, काय घडलं?

IND U19 vs SL U19 SF: जेतेपदासाठी India vs Pakistan भिडणार? उपांत्य फेरीत माफक धावांचे लक्ष्य; श्रीलंका, बांगलादेशला अपयश

SCROLL FOR NEXT