Priya Prakash Varrier claims viral wink was her idea, gets sarcastic reply from director Omar Lulu  SAKAL
मनोरंजन

Priya Prakash Varrier: डोळा मारून पाच वर्षे झाली पण अजून वाद संपलेला नाही, प्रियावर संतापला दिग्दर्शक, जाणून घ्या प्रकरण

तिने डोळा मारला अन् तिने जिंकलं. ती म्हणजे प्रिया प्रकाश वारियर

Devendra Jadhav

Priya Prakash News and Director Omar Lulu News: २०१८ साल. तिने डोळा मारला अन् तिने जिंकलं. त्या गाण्याचा व्हिडिओ लाँच झाला आणि सगळीकडे एकच चर्चा गाजली. ती म्हणजे प्रिया प्रकाश वारियर.

'ओरु अदार लव्ह' चित्रपटातील एक गाणे रिलीज झाले. आता हे गाणे रिलीज होऊन सहा वर्षे आणि चित्रपट रिलीज होऊन पाच वर्षे उलटली आहेत.

परंतु या गाण्याची जान असलेल्या प्रियाने एक भलताच दावा केल्याने दिग्दर्शक ओमर लुलू संतापले आहेत. काय झालंय नेमकं जाणून घेऊ..

(Priya Prakash Varrier claims viral wink was her idea, gets sarcastic reply from director Omar Lulu)

प्रिया प्रकाश वारियरने नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला की डोळा मारणे म्हणजेच 'विंक'ची कल्पना तिला सुचली.

चित्रपटातील माणिक्य मलाराया पूवी या गाण्यात भुवया उंचावण्याची आणि डोळे मिचकावण्याची कल्पना मला सुचली. असा दावा प्रियाने केलाय.

प्रियाने हे सांगताच तिचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. यानंतर दिग्दर्शक उमर लुलूने त्यांच्यावर निशाणा साधत पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'गरीब मुलगी पाच वर्षानंतर विसरली असेल.

स्मरणशक्ती कमी करण्यासाठी वल्ल्याचंदनदी (आयुर्वेदिक औषध) उत्तम आहे. वास्तविक, त्याने प्रियांकाला हे औषध वापरण्याची सूचना केली.

कारण डोळ्यांवर मारण्याची कल्पना दिग्दर्शकाची होती आणि प्रियाने स्वतः पाच वर्षांपूर्वी मुलाखतीत हे मान्य केलं होतं.

दिग्दर्शकाने त्या मुलाखतीची क्लिपही शेअर केलीय, ज्यामध्ये ती म्हणतेय की, 'दिग्दर्शकाने मला डोळे मिचकावायलाही सांगितले'.

माणिक्य मलाराया हे गाणं इतकं लोकप्रिय झालंय की, या गाण्याचा व्हिडिओला आतापर्यंत यूट्यूबवर 107 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

दुसरीकडे, प्रियाने अद्याप ओमर लुलूच्या पोस्टवर प्रत्युत्तर दिलेले नाही. त्यामुळे डोळा मारण्यामुळे लोकप्रिय झालेल्या या गाण्याची आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT