Karan Johar, Priyanka Chopra Instagram
मनोरंजन

Video: अंबानींच्या कार्यक्रमात प्रियंकाला पाहून लपताना दिसला करण जोहर..देसी गर्लपासून वाचण्यासाठी घेतला दीपिकाचा आसरा

प्रियंका चोप्रा आणि करण जोहर एकमेकांना इग्नोर करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Karan Johar आणि प्रियंका चोप्रा यांच्या लेटेस्ट व्हिडीओवर सध्या सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. कारण खरंतर खूप मोठं आहे. त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राची एक मुलाखत व्हायरल झाली तेव्हा तिनं पहिल्यांदा मोकळेपणानं आपण बॉलीवूड सोडलं याचा स्विकार केला आणि ते का सोडलं हे देखील बोलून दाखवलं.

आपलं चांगलं सुरु असलेलं करिअर सोडून हॉलीवूडमध्ये जाण्यापाठीचं प्रियंका चोप्राचं कारण ऐकून सगळेच अवाक झाले.प्रियंकानं तिला कसं साईडला केल गेलं आणि काम मिळायचं थांबलं याचा खुलासा केला. तिनं तिच्यासोबत कसं राजकारण खेळलं गेलं याविषयी देखील सांगितलं.

या सगळ्यानं आपण त्रासलो होतो असं देखील ती म्हणाली. प्रियंकाच्या या वक्तव्यानंतर लागलीच बॉलीवूड क्वीन कंगना रनौतनं करण जोहरवर निशाणा साधला आणि प्रियंकासोबत जे काही झालं त्याला बॉलीवूड माफिया गॅंग जबाबदार असल्याचं म्हटलं.

हे सगळं घडून जास्त वेळ झालाही नसेल तर एक व्हिडीओ समोर आला आहे ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडीओत प्रियंका चोप्रा आणि करण जोहर एकमेकांना इग्नोर करताना दिसत आहेत.(Priyanka Chopra And Karan Johar ignores each other at nmacc opening )

मुंबईत शुक्रवारी रात्री बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटनं सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये देशातीलच नाही तर जगभरातील बडे-बडे लोक हजर होते.

याच सोहळ्यात सामिल होण्यासाठी प्रियंका चोप्रा आपला पती निक जोनस आणि मुलगी मालती चोप्रा जोनस यांच्यासोबत मुंबईत आली होती. या सोहळ्यात पोहोचल्यानंतर फिल्म वर्तुळातील अनेक सेलिब्रिटींना एकमेकांना एकत्र भेटण्याची संधी मिळाली आणि इथेच प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदूकोणही एकमेकींना भेटल्या.

हेही वाचा: महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

लोकांच्या नजरा मात्र एका महत्त्वाच्या ठिकाणी खिळल्या तो क्षण होता प्रियंका चोप्रापासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी करण जोहरची जी धावपळ सुरू होती त्याचा. यानंतर तो प्रियंकाच्या दिशेने गेला पण तेवढ्यात देसी गर्लनं त्याला टोटल इन्गोर केलं आणि मग अगदीच फॉर्मल अंदाजात दोघे समोर आलो म्हणून भेटायचं म्हणून उगाचच हसले अन् भेटले.

काही वेळ दोघांनी एकमेकांशी बातचीतही केली,जिथे निक जोनसही त्यांच्यासोबत होता. आता हा व्हिडीओ सगळ्यांना हैराण करुन सोडताना दिसत आहे.

माहितीसाठी थोडं सांगतो की प्रियंका चोप्रानं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की तिनं बॉलीवूड यासाठी सोडलं की तिला मनासारखं काम नाही मिळत होतं आणि तिथल्या राजकारणामुळे ती त्रासली होती. तिनं हे देखील सांगितलं होतं की बॉलीवूडमध्ये तिला जे काम मिळत होतं त्यामुळे ती खुश नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT