Priyanka Chopra And Nick Jonas Planning Another Baby After Daughter Malti Marie?  Google
मनोरंजन

Priyanka ची मुलगी 6 महिन्याची झाली, दुसऱ्या बाळाचेही प्लॅनिंग सुरू,यावेळी..

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांनी जानेवारी,२०२२ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून एका छोट्या बाळाचं आपल्या आयुष्यात वेलकम केलं आहे.

प्रणाली मोरे

जानेवारी २०२२ मध्ये,प्रियंका चोप्रा(Priyanka chopra) आणि निक जोनस(Nick Jonas) यांनी सरोगसीच्या माध्यमातून एका छोट्या बाळाचं आपल्या आयुष्यात वेलकम केलं. प्रियंका आणि निक यांनी या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा-जोनस असे ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत मुलीची झलकही प्रियंका-निकने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अर्थात,अजून काही चाहत्यांना तिचा चेहरा दिसण्याचं भाग्य लाभलेलं नाही,कारण कपनले याबाबतीत योग्य ती काळजी व्यवस्थित घेतली आहे. मालती सध्या ६ महिन्यांची आहे,पण त्यातच आता महत्त्वाच्या सूत्रांकडून म्हणजे प्रियंकाच्या निकवर्तीयांकडून बातमी कळतेय की प्रियंका-निकने दुसऱ्या बाळाची देखील तयारी सुरु केली आहे.(Priyanka Chopra And Nick Jonas Planning Another Baby After Daughter Malti Marie?)

प्रियंका आणि निक जोनस यांनी काही दिवसांपूर्वीच मालती सहा महिन्यांची झाली म्हणून वाढदिवस साजरा केला होता. त्या सोहळ्याचे फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. कपलच्या निकटवर्तीयांकडून माहिती मिळत आहे की,प्रियंका आणि निकला आपल्या मुलीच्या आयुष्यात भावा-बहिणीची कमतरता ठेवायची नाही. त्यामुळे दोघेही सरोगसीच्या माध्यमातून दुसऱ्या बाळाच्या तयारीत आहेत.

''प्रियंका आणि निकचं म्हणणं आहे की आयुष्यात भावा-बहिणीचं प्रेम मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मालतीच्या बाबतीतही ते तसाच विचार करत आहेत. आता लगेच नाही पण काही महिन्यांनी ते दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करण्याच्या विचारात आहेत. पण जेव्हा देखील हा विचार पक्का होईल तेव्हा सरोगसीच्या माध्यमातून त्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला जाईल. दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग हे दोघे करत आहेत यात काहीच डाऊट नाही,फक्त ते कधी करणार एवढंच अजून ठरायचं आहे''.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, निकला आपल्या मुलांच्या वयात फार अंतर नको आहे. त्याला वाटतं,त्याची मुलं देखील त्याच्या भावंडांप्रमाणेच असावीत, ज्यांच्यात वयाचं फार अंतर नाही. एवढंच नाही तर त्याच्या आई-वडीलांना देखील हेच वाटत आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रियंकाने आपल्या ४० व्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तिच्या सासर-माहेरच्या मोठ्या कुटुंबाची झलक पहायला मिळाली होती. आपल्या वाढदिवशी कुटुंबाची सोबत आपल्यासाठी खूप खास गोष्ट आहे असं प्रियंकाने पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT