Priyanka Chopra and Nick Jonas share first photo of baby after 100 days in hospital  sakal
मनोरंजन

१०० दिवसांनी परतलं प्रियंका चोप्राचं बाळ.. रुग्णालयातील ते दिवस..

प्रियंका चोप्राची मुलगी गेली शंभर दिवस रुग्णालयात होती. या विषयी काल 'mother's day' च्या निमित्ताने प्रियंकाने एक पोस्ट लिहीली.

नीलेश अडसूळ

बॉलीवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (priyanka chopra) कायमच चर्चेत असते. आपल्या दैनंदिन आयुष्यात घडामोडींची माहिती ती आपल्याला चाहत्यांना देत असते. शिवाय मनोरंजन विश्वातील हालचालींवरही तिचे बारीक लक्ष असते. त्यावर भाष्य करणेही ती पसंत करते. मध्यंतरी सरोगसीच्या वादात ती अडकली होती. तर नुकतंच तिने तिच्या मुलीचे नामकरण केले. 'मालती मेरी' असे तिने आपल्या मुलीचे नाव ठेवले आहे. परंतु या मुलीबाबत एक धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे.

प्रियांकाने आपल्या मुलीबाबत गोड बातमी दिल्यापासून प्रियंकाच्या मुलीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. ही प्रतीक्षा अनेक मदर्स डे (mother's day) च्या रात्री संपली. कारण प्रियांकाने तिच्या मुलीचा फोटो इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला. पण त्या सोबतच डोळे पाणावणारा मेसेजही तिने लिहिला आहे.

'मदर्स डे'च्या निमित्ताने प्रियंका चोप्राने रात्री उशिरा तिच्या बाळाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या मुलीचा चेहरा दिसत नसला तरी चाहत्यांसाठी एक गोंडस आणि निरागस बाळ प्रियांकाच्या कुशीत निजले आहे. प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये पती निक जोनासही (nick jonas) तिच्यासोबत दिसत आहे. प्रियांकाने बाळाला छातीशी कवटाळलं आहे तर निक आपल्या लेकीकडे प्रेमाने पाहत आहे.

हा फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिलं आहे की, "मदर्स डे च्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की, गेले काही दिवस आमच्यासाठी रोलर कोस्टर राईडसारखे (अत्यंत खडतर) होते. आम्हाला माहित आहे की अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. NICU (रुग्णलयातील अतिदक्षता विभाग) मध्ये १०० हून अधिक दिवस असलेलं आमचं बाळ अखेर घरी आलं. प्रत्येक कुटुंबाचा प्रवास काहीसा वेगळा असतो आणि त्यासाठी एका सबळ विश्वासाची गरज असते. आमच्या आयुष्यातील मागील काही महिने प्रचंड आव्हानात्मक होते. मागे वळून पाहिलं तर प्रत्येक क्षण किती मौल्यवान आणि परिपूर्ण आहे याची जाणीव होते. आमची चिमुकली घरी आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही लॉस एंजेलिसमधील रेडी चिल्ड्रन्स ला जोला अँड सेडर्स सिनाई मधील निस्वार्थी पणे काम करणाऱ्या प्रत्येक डॉक्टर, नर्स आणि तज्ज्ञांचे आभार मानतो. आमचा पुढचा प्रवास आता सुरु होत आहे आणि आमचं बाळ प्रचंड बदमाश आणि साहसी आहे." अशी पोस्ट तिने लिहिली आहे. या पोस्ट नंतर प्रियंकाच्या बाळाला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT