Priyanka Chopra gives Suprise gift to Nick Jonas  Team esakal
मनोरंजन

नवरा असावा तर असा, प्रियंकाला निकनं दिलं खास 'बर्थडे गिफ्ट'

आता प्रियांका केवळ बॉलीवूड पुरतीच मर्यादित राहिली नाही. ती हॉलीवूडमध्येही प्रसिद्ध आहे

युगंधर ताजणे

मुंबई - आता प्रियांका केवळ बॉलीवूड पुरतीच मर्यादित राहिली नाही. ती हॉलीवूडमध्येही प्रसिद्ध आहे. ती आणि तिचा पती निक जोन्स यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी ऑस्कर पुरस्कारांची घोषणा केली होती. सोशल मीडियावर ती यादी जाहीर करण्याचा मान त्यांना मिळाला होता. नुकताच प्रियंकाचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. तिला तिच्या चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या. तिच्या पुढील प्रवासासाठी अभिष्टचिंतनही केले. यासगळ्यात प्रियांकाच्या पतीनं म्हणजे निकनं तिला काय स्पेशल गिफ्ट दिलं याची चर्चाही मोठ्या प्रमाणावर झाली. (priyanka chopra birthday nick jonas gift expensive bottle of wine to wife price leave you shocked yst88)

सध्या निकनं प्रियांकाला दिलेल्या गिफ्टची मोठी चर्चा होतेय. प्रियांकाच्या 39 व्या जन्मदिनानिमित्तानं तिला निकनं मोठं गिफ्ट दिलंय. निकनं प्रियंकाला एक महागडी वाईन्सची बॉटल दिली आहे. त्याची किंमत प्रचंड आहे. निकनं आपल्या इंस्टावर त्या वाईनच्या बॉटल्सचा एक फोटोही शेयर केला आहे. त्यावर Chateau Mouton Rothschild 1982 असे लिहिले आहे. त्यामुळे त्या वाईनची बॉटल किती महाग असेल याचा अंदाज आपण लावू शकतो.

प्रियंकानं निकला एक पोस्ट टॅग केली आहे. त्यात तिनं हार्ट शेपचा इमोजीही शेयर केला आहे. तिनं सांगितलं आहे की, मला माझ्या पतीनं खास भेट पाठवली आहे. त्या नोटमध्ये निकनं लिहिलं आहे की, तुला जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. तु जगातील प्रत्येक आनंदाच्या क्षणाची साक्षीदार व्हावी अशी माझी इच्छा आहे. मी आज आणि उद्याही तुझ्यावर खूप प्रेम करत राहील यात शंका नाही. त्यानंतर त्याच्या महागड्या गिफ्टचा फोटोही आला आहे.

तुम्हाला सांगावं लागेल ते म्हणजे निकनं प्रियांकाला दिलेल्या वाईनच्या बॉटलची किंमत ही तब्बल 1 लाख 31 हजार रुपये एवढी आहे. त्या वाईनचे नाव Chateau Mouton Rothschild 1982 असे आहे. या वाईनची निर्मिती Cabernet Franc याठिकाणी केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT