Priyanka Chopra Esakal
मनोरंजन

Priyanka Chopra: पहिला सिनेमा ऑफर झाला तेव्हा नाराजच होती प्रियंका.. निर्मात्यासमोर ढसाढसा रडत म्हणाली होती..

'अंदाज' सिनेमाचे निर्माते सुनिल दर्शन यांनी एका मुलाखतीत प्रियंकाविषयी काही खुलासे केले आहेत.

प्रणाली मोरे

Priyanka Chopra आता फक्त बॉलीवूड अभिनेत्री राहिलेली नाही तर एक ग्लोबल पर्सनॅलिटी झालेली आहे. तिनं आपल्या हिमतीवर इंडस्ट्रीत आपलं स्थान पक्क केलं आहे. आपल्या पहिल्या सिनेमात अभिनेत्रीनं खलनायकी भूमिका साकारली होती. पण तुम्हाला माहित आहे का की या भूमिकेसाठी प्रियंका तयारच नव्हती सुरुवातीला. चला जाणून घेऊया नेमकी काय होती कहाणी..(Priyanka Chopra Debut movie andaaz actress cried after getting negative role in first movie)

प्रियंका चोप्रानं 'अंदाज' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आणि हा सिनेमा तिच्या कारकिर्दीतील हिट सिनेमांपैकी एक आहे. पहिल्याच सिनेमापासून प्रियंकानं इंडस्ट्रीत आपली पकड पक्की केली होती.

पण, बोललं जातं की जेव्हा अभिनेत्रीला माहित पडलं की पहिल्याच सिनेमात तिची भूमिका खलनायिकेची आहे,तेव्हा ती ढसाढसा रडली होती. अंदाज सिनेमाचे निर्माते सुनील दर्शन यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता.

सिद्धार्थ कननच्या एका मुलाखतीत सुनिल दर्शन यांनी प्रियंकासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, त्यांनी जवळपास इंडस्ट्रीतील सगळ्याच अभिनेत्रींसोबत काम केले आहे. ज्यात जुही चावला, करीना कपूर, करिश्मा कपूर यांची आणि इतरही बरीच नावं घेता येतील.

पण प्रियंका सोबत काम करण्याचा त्यांच्या अनुभव खूपच भन्नाट होता. निर्माता म्हणाला की, त्या सिनेमानं प्रियंकाला यश दिलं असतं किंवा तिच्या नावावर एक मोठा फ्लॉप जमा झाला असता. पण तिच्या नशिबानं सिनेमा हीट झाला आणि प्रियंकाच्या करिअरला गती मिळाली.

''पहिल्या भेटीत मला प्रियंकाला पाहून वाटलं होतं की या मुलीत काही गोष्टींची कमतरता आहे ज्याला सुधारण्याची गरज आहे''.

सुनिल दर्शन पुढे म्हणाले,''एक तर तिचा रंग सावळा होता पण तिला इंडस्ट्रीत स्वतःला सिद्ध करण्याची भूक होती. माझी पूर्ण टीम,राज कंवर,अक्षय कुमार जेवढे त्यावेळी सेटवर असायचे ते सगळे लारा दत्ताची प्रशंसा करायचे''.

''पण मी म्हटलेलं,लारा द्त्ता चांगलीच आहे पण ब्लॅक हॉर्स रेखा येतेय आता इंडस्ट्रीत ..आणि ती आहे प्रियंका चोप्रा''.

'अंदाज' सिनेमात नकारात्मक भूमिका केल्यानंतरही प्रियंकाला खूप पंसत केलं गेलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard attack Jalgaon : जळगावमध्ये बिबट्याची दहशत; आमदार चंद्रकांत पाटील जखमी, तीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

Asha Bhosle: संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत!

फक्त संगीतातच नाहीतर पाककलेत सुद्धा अव्वल होत्या आशा भोसले, जगभरात रेस्टॉरंट आणि...

Asha Bhosle Video: "मला हे दत्त गुरु दिसले...." ; आशा भोसलेंचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, भावस्पर्शी स्वराने मन भारावलं

Crispy Dosa Secret Reveal: कुरकुरीत डोशामागचं विज्ञान उलगडलं! ‘या’ एका टेस्टमुळे बनतो परफेक्ट डोसा

SCROLL FOR NEXT