Priyanka Chopra enjoys pani puri as she hosts her 'favourites' at her NYC restaurant Sona  sakal
मनोरंजन

Priyanka Chopra: न्यूयॉर्कमध्ये प्रियंकाला पाणीपुरीची भुरळ..

कुठेही जा, पण पाणीपूरी हवीच! प्रियंकानं न्यूयॉर्कमध्ये खाल्ली पाणीपुरी..

नीलेश अडसूळ

Priyanka Chopra : बॉलीवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) कायमच चर्चेत असते. आपल्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडींची माहिती ती आपल्याला चाहत्यांना देत असते. शिवाय मनोरंजन विश्वातील हालचालींवरही तिचे बारीक लक्ष असते. प्रियंकाची सरोगसी, तिच्या मुलीला पाहण्याची उत्सुकता यामुळे ती कायमच चर्चेत राहिलेली आहे. शिवाय तिच्या 'सोना' ब्रॅंडचीही बरीच चर्चा आहे. पण सध्या ती चर्चेत आली कारण चक्क न्यूयॉर्कमध्ये तिने पाणीपूरीचा आस्वाद घेतला आहे. (Priyanka Chopra enjoys pani puri as she hosts her 'favourites' at her NYC restaurant Sona)

प्रियांका सध्या आपल्या पती सोबत म्हणजेच निक जोनस सोबत परदेशी राहते. त्यामुळे प्रियांका ती आणि तिचा पती दोघेही सध्या न्यूयॉर्कच्या विविध इव्हेंट्समध्ये सहभाग घेत असतात. प्रियांकानं नुकत्याच एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमधील व्हिडीओ प्रियांकानं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांकासोबत नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई देखील दिसत आहे. प्रियांकानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती चक्क पाणीपुरी खाताना दिसत आहे. 

या इव्हेंटला प्रियंका सोबत तिचा नवरा निक देखील आहे. यावेळी प्रियांकानं ब्लॅक बॅकलेस आऊटफिटमध्ये परिधान केलेला दिसत आहे. तिच्या लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधलेच शिवाय परदेशी राहूनही तिला भारतीय पदार्थाविषयी वाटणारी गोडी पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. त्यामुळे प्रियंका आणि पाणीपूरी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT