PRIYANKA 
मनोरंजन

प्रियांका चोप्राने विकले अंधेरीतील दोन फ्लॅट्स; जाणून घ्या किंमत

फेब्रुवारी महिन्यात प्रियांकाने जुहूमधला फ्लॅट जॅकलिन फर्नांडिसला विकला.

स्वाती वेमूल

बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने Priyanka Chopra मुंबईतील वर्सोवा, अंधेरी या भागातील दोन फ्लॅट विकले आहेत. प्रियांकाने हे दोन्ही फ्लॅट्स ७ कोटी रुपयांना विकले आहेत. २६ मार्च २०२१ रोजी फ्लॅट्स विक्रीचा करार नोंदविला गेला. त्यातील एक फ्लॅट ३ कोटी तर दुसरा ४ कोटी रुपयांना विकला गेला. (Priyanka Chopra Jonas sells two flats in Mumbai for Rs 7 crore slv92)

Zapkey.com ने दिलेल्या माहितीनुसार, ८८८ चौरसफूट आणि १२१९ चौरस फुटांचे हे दोन फ्लॅट्स होते. अंधेरीतील एका इमारतीतील सातव्या मजल्यावर हे दोन्ही फ्लॅट्स होते. याआधी फेब्रुवारी २०२० मध्ये प्रियांकाने अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील करण अपार्टमेंट २ कोटी रुपयांना विकला होता. विशेष म्हणजे, बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने हिनेसुद्धा त्याच इमारतीतील तिचे दोन फ्लॅट्स ८.१८ कोटी रुपयांना विकले होते.

गायक निक जोनासशी लग्न केल्यानंतर प्रियांका लॉस एंजिलिसला राहायला गेली. प्रियांका सध्या विविध हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असून युकेमध्ये तिचं शूटिंग सुरू आहे. लॉस एंजिलिसमध्येही प्रियांका-निकचं २० दशलक्ष डॉलर्सचं घर आहे.

'पिंकविला'ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील जुहू इथलं प्रियांकाचं घर नुकतंच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने विकत घेतलं आहे. २०१८ मध्ये निकशी लग्न करण्यापूर्वी प्रियांका याच घरात राहत होती. या फ्लॅटची किंमत ७ कोटी रुपये इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

SCROLL FOR NEXT