Priyanka Chopra Nick Jonas Daughter Malti Parineeti  esakal
मनोरंजन

Priyanka Chopra : मावशीच्या लग्नाला मालती आली? प्रियंका-निकचं भारतात आगमन!

अशातच आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी प्रियंका पतीसह भारतात आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याचे कारण तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

युगंधर ताजणे

Priyanka Chopra Nick Jonas Daughter Malti Parineeti : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे आता भारतात आले आहे. ते भारतात येण्यामागील कारण म्हणजे प्रियंकाची बहिण परिणीती चोप्रा हे आहे. तिचं आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाबाबत मोठी चर्चा रंगली आहे.

परिणीती आणि राघव चढ्ढा यांचे गेल्या काही दिवसांपासून डेटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्या जवळच्या एका मित्रानं तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अशा अर्थाची सुचक पोस्ट केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर चाहत्यांनी देखील परिणीतीला खूप साऱ्या शुभेच्छा देत तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले आहे. आता तर परिणीतीच्या लग्नाविषयी नेटकरी वेगवेगळे प्रश्न विचारु लागले आहेत.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

अशातच आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी प्रियंका पतीसह भारतात आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याचे कारण तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये प्रियंका, तिची मुलगी मालती आणि पती निक जोनास हे दिसत आहे. त्या फोटोंवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये नेटकऱ्यांनी प्रियंकाची मुलगी मालती आणि तिची मावशी परिणीती यांच्याविषयी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

प्रियंका आणि निक मालतीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच तिला घेऊन भारतामध्ये येत आहे. ते भारतात आल्यानंतर फोटोग्राफर्सनं त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरु केला आहे. पापाराझ्झींनी मालती, प्रियंका आणि निक यांचे फोटो घेऊन ते सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका, निक जोनास हे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानींच्या कल्चरल सेंटरच्या उद्धघाटनसाठी आले आहेत. मात्र यासगळ्यात प्रियंकाची मालती चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. काहींनी तर यासगळ्याचा संबंध परिणीती चोप्राशी जोडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे, पालकमंत्र्यांची दिल्लीवारी; भाजपचं नाव ठरलं पण

Beed News: इंधन दरवाढ, नीट पेपरफुटी विरोधात बीडमध्ये एल्गार पँथर सेना आणि आंबेडकर विकास मंच आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT