Priyanka Chopra
Priyanka Chopra Bollywood news
मनोरंजन

प्रियंका-निक आता थकले की काय? बाळाला सोडून...

सकाळ डिजिटल टीम

तीन वर्षांच्या आनंदी वैवाहिक जीवनानंतरही, अभिनेत्री-निर्माती प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास एकमेकांच्या प्रेमात आहेत. दोघेही सोशल मिडीयावर एकमेकांसोबतचे फोटोज आणि व्हिडीओ शेअर रकत असतात. अलीकडे, बेवॉच अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना तिचा 'आवडता रविवार' कसा दिसतो याची झलक दिली. (Priyanka-Nick welcomes a babygirl)

निःसंशयपणे, हे जोडपे सरोगसीद्वारे स्वीकारलेल्या बाळाची काळजी घेण्यात व्यस्त आहे. त्यांनी रविवारी स्वत:साठी थोडा वेळ काढून लॉंग ड्राईव्हला गेले. इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रियांकाने “माझा आवडता संडे” या कॅप्शनसह एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये, कारमध्ये पी.सी.ने (Priyanka Chopra) निकचा हात पकडला आहे.

अलीकडेच, 21 जानेवारीला, जोडप्याने उघड केले की त्यांनी सरोगसीद्वारे बाळाचे स्वागत केले आहे. या दोघांनी आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर एक संयुक्त निवेदन जारी केले. “आम्ही सरोगसीद्वारे बाळाचे स्वागत केले आहे हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही सध्या आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे आम्ही या विशेष काळात प्रायव्हसीची अपेक्षा करतो.'' त्यांनी अद्याप त्यांच्या बाळाबद्दल तपशील उघड केलेला नसताना, प्रियांकाची चुलत बहीण मीरा चोप्राने या जोडप्याला मुलगी असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT