priyanka chopra on female led films performing terribly at box office kangana ranaut tejas vnp98  Esakal
मनोरंजन

Priyanka On Kangana: "आम्ही महिला-केंद्रित चित्रपट बनवतो तेव्हा...", कंगनाच्या तेजस चित्रपटावर प्रियांकाची प्रतिक्रिया

तेजस चित्रपटात कंगना राणौत मुख्य भूमिकेत आहे. ती या चित्रपटात वायुसेना अधिकारी तेजस गिलची भूमिका साकारत आहे. 'तेजस' हा एक महिला-केंद्रित चित्रपट आहे.

Vaishali Patil

Priyanka Chopra's reaction on Kangana's Tejas: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या 'तेजस' या सिनेमामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. कंगनाने या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कसलीच कमी ठेवली नाही मात्र तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु शकलेला नाही.

तेजस चित्रपटात कंगना राणौत मुख्य भूमिकेत आहे. ती या चित्रपटात वायुसेना अधिकारी तेजस गिलची भूमिका साकारत आहे. 'तेजस' हा एक महिला-केंद्रित चित्रपट आहे ज्यामध्ये कंगना रणौत मुख्य भुमिकेत आहे. मात्र, ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरताना दिसत आहे.

कंगना राणौतचे सलग अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे तिला चित्रपटाकडून अपेक्षा होत्या मात्र या फ्लॉप चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये महिला केंद्रीत चित्रपटांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान कंगनाने देखील तिच्या या फ्लॉप सिनेमाबाबत प्रतिक्रिया दिली होती. ती चित्रपट महोत्सवांदरम्यान तिच्या बॉलिवूडमधील प्रवास आणि संघर्षांबद्दल बोलली. दरम्यान, महिलाकेंद्रित चित्रपट फ्लॉप होत असल्याने याचा तिच्यावर खूप वाईट परिणाम होत असल्याचेही कंगनाने सांगितले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्रा यावेळी म्हणाली, “जेव्हा आम्ही महिला-केंद्रित चित्रपट करतो तेव्हा आमच्यावर खूप दबाव असतो. महिलांवर आधारित अनेक चित्रपट यशस्वी होताना दिसत आहेत, पण जेव्हा एखादा चित्रपट यशस्वी होत नाही तेव्हा दबाव वाढतो.

तर दुसरीकडे तेजस चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, 'तेजस'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ 1.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर शनिवारी 1.3 कोटी आणि रविवारी 1.20 कोटींची कमाई केली. तर Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'तेजस' ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी फक्त 50 लाख रुपये कमावले असून आता या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 4.25 कोटी रुपये झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

मला डावललं गेलं, मी फोन केले तरीही... अभिनेत्याने सांगितलं 'पारू' मालिका सोडण्याचं खरं कारण, म्हणाला- त्यांनी मला...

Cough Syrup For Kids: लहान मुलांना कफ सिरप देताय? थांबा...ही महत्त्वाची माहिती नक्की वाचा

"तू महाराष्ट्राचा बिहार केलास.." मराठी अभिनेत्याचे गौतमी पाटीलला खडेबोल "साधी माणुसकी.."

SCROLL FOR NEXT