priyanka chopra on 'chandramukhi' marathi movie sakal
मनोरंजन

प्रियंका चोप्राही 'चंद्रमुखी'च्या प्रेमात.. आदिनाथ, अमृताला दिल्या खास शुभेच्छा..

प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटाला आता बॉलीवूडमधूनही शुभेच्छा येऊन लागल्या आहेत.

नीलेश अडसूळ

बॉलीवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (priyanka chopra) कायमच चर्चेत असते. आपल्या दैनंदिन आयुष्यात घडामोडींची माहिती ती आपल्याला चाहत्यांना देत असते. शिवाय मनोरंजन विश्वातील हालचालींवरही तिचे बारीक लक्ष असते. त्यावर भाष्य करणेही ती पसंत करते. मध्यंतरी सरोगसीच्या वादात ती अडकली होती. तर नुकतंच तिने तिच्या मुलीचे नामकरण केले. 'मालती मेरी' असे तिने आपल्या मुलीचे नाव ठेवले आहे. एरव्ही बॉलीवूड चित्रपटांवर भाष्य करणाऱ्या प्रियंकाने यंदा चक्क मराठी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर बेतलेला, प्रसाद ओक (prasad oak) दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपट अवघ्या काही दिवसातच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील गाण्यांची भुरळ अनेकांना पडली आहे. 'चंद्रा', 'बाई गं' या दोन लावण्या प्रसिद्ध झाल्या असून या गाण्यांवर थिरकण्यात चाहते दंग झाले आहेत. अमृता खानविलकर (amruta khanvilkar) आणि आदिनाथ कोठारे (adinath kothare) यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २९ एप्रिल ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला सध्या बॉलीवूडमधूनही शुभेच्छा येऊ लागल्या आहेत .

कॉमेडियन भारती सिंग पाठोपाठ आता बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही चंद्रमुखी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर चंद्रमुखी चित्रपटाचे एक पोस्टर तिने शेअर केले आहे. यासोबत तिने चंद्रमुखी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. ‘अभिनंदन आदिनाथ कोठारे. येत्या २९ एप्रिलला चंद्रमुखी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात..’, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. तसेच अमृता खानविलकर आणि संपूर्ण टीमलाही तिने शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT