Priyanka Chopra React To Women Reservation Bill 
मनोरंजन

Priyanka Chopra: "हे विधेयक अमलात..", महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यावर काय म्हणाली प्रियंका चोप्रा?

Vaishali Patil

Priyanka Chopra React To Women Reservation Bill: गेल्या काही दिवसांपासून लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक चर्चेत होते. नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने महिलांना आता लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळेल.

हे विधेयक एक तृतियांश पेक्षा जास्त मतांनी मंजूर करण्यात आले. नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाल्याने हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचं मानलं जात आहे.

हे विधेयक मंजूर झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांपासून तर कलाकारांपर्यंत सर्वांनीच यावर आपली मते मांडली आहेत. आता अभिनेत्री प्रियांका चोप्राने महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Priyanka Chopra React To Women Reservation Bill

प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हे विधेयक मंजूर झालेल्या बातमीचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात प्रियंकाने लिहिले की, 'हे ऐतिहासिक पाऊल नव्या युगासाठी प्रेरणा देणारे आहे. महिला आरक्षण विधेयक आणि नारी शक्ती वंदन कायदा मंजूर होणे हे निःसंशयपणे योग्य दिशेने टाकलेलं पाऊल आहे. मात्र, त्याची लवकर अंमलबजावणी महत्त्वाची आहे. आम्ही अशा भारताकडे वाटचाल करत आहोत जो खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करेल.'

प्रियांका चोप्राच्या आधी हेमा मालिनीपासून तर कंगनापर्यंत सर्वांनीही महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला होता. हेमा मालिनी म्हणाल्या होत्या की मोदीजींनी तेच केले जे कोणीही करू शकत नाही.

कंगना रणौतने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करत याला ऐतिहासिक म्हटले तर ईशा गुप्ताने याला गेम चेंजर बिल म्हणत याचे कौतुक केले होते.

महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे. आता राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर कायदा बनवण्याची वाटचाल सुरू होणार आहे. मात्र, हे विधेयक अमलात आणण्यासाठी अजून बराच वेळ लागेल असं बोललं जात आहे. २०२६ नंतर नारी शक्ती वंदन कायदा लागू होईल. त्यानंतर महिलांना आरक्षण मिळण्यास सुरुवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT