Priyanka Chopra reacts after netizens call Sushmita Sen 'gold digger' Instagram
मनोरंजन

Sushmita Sen ला 'गोल्ड' डिगर म्हटल्यावर प्रियंका चोप्रा भडकली,म्हणाली...

ललित मोदीनं सुश्मितासोबतचं नातं जगजाहिर केल्यावर आता ट्रोलर्सनी अभिनेत्रीवर गलिच्छ भाषेत कमेंट करायला सुरुवात केली आहे.

प्रणाली मोरे

सुश्मिता सेन(Sushmita Sen) नेहमीच आपल्या लव्हलाइफमुळे चर्चेत राहिली आहे. पण ललित मोदी(Lalit Modi) सोबतचं प्रेमकरण मात्र तिला भलतंच महाग पडतंय, लोक तोंडाला येईल ते बोलत सुटलेयत. सोशल मीडियावर तर तिला वाईट पद्धतीनं ट्रोल केलं जात आहे. कितीतरी लोकांनी सुश्मिताला 'गोल्ड डिगर' म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. सुष्मिता सेनला ट्रोल केल्यानंतर मात्र तिच्या समर्थनार्थ प्रियंका चोप्रा(Priyanaka Chopra) पुढे आली आहे.(Priyanka Chopra reacts after netizens call Sushmita Sen 'gold digger')

सुश्मिताला लोकांनी 'गोल्ड डिगर' म्हटल्यावर तिनं देखील चांगल्याच शब्दात ट्रोलर्सचा समाचार घेतला, तिनं एक लांबलचक पोस्ट लिहित आपला द्वेष करणाऱ्या ट्रोलर्सना चांगलंच फटकारलं. प्रियंकाने सुश्मिताच्या या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे, ''Tell em queen!''. प्रियंका व्यतिरिक्त नेहा धुपिया,रणवीर सिंग,सुनिल शेट्टीसोबत आणखी काही सेलिब्रिटींनी सुश्मिताच्या पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा देत तिच्या प्रती असलेलं प्रेम,आपुलकी जाहिर केली आहे.

Priyanka And many celebrity reacts on Sushmita Sen Post

सुश्मिता सेनने आपल्या नव्या पोस्टमध्ये 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. सुश्मिताने मालदीव हॉलिडेवर असताना मोनोकनीत आपले सुपर हॉट फोटो शेअर करत ट्रोलर्सवर कडक शब्दात पलटवार केला आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,''माझं अस्तित्व आणि सद्सदविवेक बुद्धीशी मी पूर्णपणे आत्मकेंद्रित आहे. आपल्या सभोवतालची सृष्टी आपल्या सगळ्यांना तिच्यात सामावून घेते. मात्र आपण निसर्गाचा हा समतोल बिघडवतो. आपल्या आजुबाजूचं जग कसं आनंदी नाही आणि दुःखी आहे हे पाहून मन अस्वस्थ होतं. स्वतःला बुद्धिजीवी म्हणवून घेणारे मुर्ख जे गलिच्छ शब्दात कमेंट करतात त्यांना मी दुर्लक्षित करते. हे लोक ना माझे ओळखीचे, ना मित्रपरिवारातले. असे लोक माझ्याबद्दल एकदम मोठमोठाले शब्द,माझ्या चारित्र्याविषयी त्यांना असलेली महत्त्वाची गहन माहिती शेअर करताना दिसतायत. मला 'गोल्ड डिगर' म्हणतायत. खूपच हुशार आहेत हे सगळे''.

अभिनेत्रीनं पुढे लिहिलं आहे, ''मी सोन्यापेक्षा जास्त हिऱ्याच्या प्रतिक्षेत आहे. मी नेहमीच हिऱ्याला माझ्या आयुष्यात प्राधान्य दिलं आहे. ज्याच्यासाठी मी प्रसिद्ध देखील आहे. आणि आजही माझ्यासाठी मीच हिरे खरेदी करते''.

आपल्या या पोस्टमध्ये सुश्मिता सेनने आपल्याला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत. सुश्मितानं हे देखील सांगितलं आहे की तिच्याविरोधातल्या या वादग्रस्त वादळानंतरही ती एकदम ठीक आहे. तिला या अशा ट्रोलिंगचा काहीच फरक पडत नाही.

ललित मोदीला डेट करण्याआधी सुश्मिता सेन रोहमन शॉलसोबत रिलेशनशीपमध्ये होती. परंतु रोहमन सोबत तीन वर्षानंतर तिनं ब्रेकअप केलं. सुश्मिता-रोहमनच्या जोडीला चाहत्यांचे भरपूर प्रेम मिळाले. पण आता दोघंही आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहिण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT