Priyanka chopra Instagram
मनोरंजन

Priyanka Chopra: 'म्हणून मी वॉशरुममध्ये जाऊन लंच करायचे..', अमेरिकेतील दिवसांविषयी प्रियंकाचा खळबळजनक खुलासा

प्रियंका चोप्रानं गेल्या काही दिवसांत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील काही खुलासे केल्यानं सगळेच हैराण झाले आहेत.

प्रणाली मोरे

Priyanka Chopra: बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रानं सांगितलं की जेव्हा ती युएसला शिफ्ट झाली होती तेव्हा सुरुवातीच्या दिवसांत ती बाहेर गेली की ती वॉशरुममध्ये जाऊन लंच करायची. प्रियंका चोप्रानं सांगितलं की ती अचानक खूप नर्व्हस व्हायची आणि तिला समजायचं नाही की कसं कॅफेटेरियात जाऊन लंच करू. आणि मनातील हीच अस्वस्थता तिला वॉशरुममध्ये जाऊन लंच करण्यासाठी भाग पाडायची.

प्रियंकानं बॉलीवूडमध्ये आपल्या बळावर चांगल यश संपादित केलं आहे. अनेक वर्ष हिंदी सिनेमाच्या लोकांचे मनोरंजन केल्यानंतर तिनं हॉलीवूडची वाट पकडली आणि आता ती जास्त हॉलीवूडच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत आहे. आज ती खूप आत्मविश्वासू दिसते पण आधी असं नव्हतं. (Priyanka Chopra used to have lunch in bathroom she felt like non-american in us)

प्रियंका चोप्राने नुकत्याच एका मुलाखतीत त्या काळाचा उल्लेख केला जेव्हा ती टीनेजर होती आणि पहिल्यांदा अमेरिकेला शिक्षणासाठी गेली होती. प्रियंका चोप्रामध्ये तेव्हा आता इतका आत्नविश्वास मुळीच नव्हता की ती सर्वांसोबत बसून लंच करेल. परदेशी लोकांमध्ये ती स्वतःला खूप कमी लेखायची. प्रियंका चोप्रानं सुरुवातीचे काही आठवडे आपल्यासाठी किती भयानक होते याचा उल्लेख केला आहे. तसंच,या सगळ्यातून ती कशी बाहेर आली,तिनं तिचा आत्नविश्वास कसा वाढवला ,स्वतःला कसं सावरलं याविषयी सांगितलं आहे.

प्रियंका चोप्रा म्हणाली,''मी त्यावेळी एक छोटं शॉप होतं त्याच्या वॉशरुममध्ये जाऊन माझा लंच करायची,कारण मी खूप नर्व्हस फील करायचे. मला माहित नव्हतं की कसं कॅफेटेरियात जाऊन तिथनं लंच घ्यायचं..मी एका वेंडिंग मशिनमधून वेफर्स खरेदी करायची. मी वॉशरुममध्ये जायची,लवकर लवकर खायची आणि पटाफट क्लासला जायची,यामुळे मग मला सगळ्यांना टाळता यायचं आणि कशाचाच सामना करावा लागायचा नाही''.

प्रियंका चोप्राने स्पष्ट सांगितलं की एक भारतीय होण्यापेक्षा जास्त मला एक नॉन-अमेरिकन असल्याचं फिलिंग जास्त यायचं.

प्रियंका चोप्रानं सांगितलं की तिनं तिच्या आयुष्यात खूप गोष्टींमध्ये बदलाव आणून अनेक नव्या गोष्टींमध्ये स्वतःला फीट करण्याचा प्रयत्न केला. आपण एका कंझर्व्हेटिव्ह फॅमिलीतून आहोत त्यामुळे आपल्याला कोणासोबत डेटवर जाण्याची किंवा नाइट आऊटसाठी बाहेर जाण्याची परवानगी नाही हे तिला तिच्या मैत्रिणींना सांगावं लागलं होतं.

अर्थात नंतर हळूहळू तिथल्या लोकांमध्ये प्रियंकानं स्वतःला अॅडजस्ट केलं आणि आत्मविश्वास प्राप्त केला ज्याकारणानं आज ती यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. प्रियंकाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर प्रियंका सध्या आपल्याला स्पाय सीरिज Citadel मध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

SCROLL FOR NEXT