priyanka chopra 
मनोरंजन

प्रियांका चोप्राच्या 'द व्हाइट टायगर'ला ऑस्कर नामांकन 

स्वाती वेमूल

बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांनी मिळून सोमवारी ऑस्कर २०२१ ची नामांकनं जाहीर केली. या यादीत प्रियांकाच्या 'द व्हाइट टायगर' या चित्रपटाचाही समावेश आहे. प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांचा हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेता गौरव आदर्शसुद्धा मुख्य भूमिकेत होता. 'द व्हाइट टायगर' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अडॉप्टेड स्क्रीनप्ले या विभागात नामांकन मिळालं आहे. विशेष म्हणजे प्रियांकाने स्वत:चं या चित्रपटाचं नामांकन जाहीर केलं होतं. त्यामुळे तिचा आनंद द्विगुणीत झाला. नंतर तिने आणि राजकुमार रावने फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. 'आम्हाला ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे. 'द व्हाइट टायगर' चित्रपटाची टीम आणि रमीन यांना खूप शुभेच्छा. चित्रपटाचं नामांकन जाहीर करताना मला खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचा मला खूप अभिमान आहे', असं प्रियांकाने ट्विट करत लिहिलं. 

प्रियांका आणि राजकुमारच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. सर्वोत्कृष्ट अडॉप्टेड स्क्रीनप्ले विभागात प्रियांकाच्या या चित्रपटासोबतच 'द फादर', 'नोमॅडलँड', 'वन नाइट इन मियामी' यांनासुद्धा नामांकन मिळालं आहे. आता यात कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

यंदाचा ऑस्कर सोहळा हा २५ एप्रिल रोजी लॉस एंजिलिसमध्ये पार पडणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा पार पडणार होता. मात्र ही तारीख पुढे ढकलण्यात आली. 'द व्हाइट टायगर' या चित्रपटाची कथा अरविंद अडिगा यांच्या 'द व्हाइट टायगर' या पुस्तकावर आधारित आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT