Priyanka Chopra-Jonas Google
मनोरंजन

हॉलीवूडच्या सिनेमात दिसणार भारतीय 'सती'

सिनेमाच्या कोरियन पोस्टरवरनं समोर आला प्रियंकाचा हटके लूक

प्रणाली मोरे

भारतीयांसाठी विशेष करून भारतीय स्त्रीयांसाठी 'सती'या नावाचं महत्त्व खूप मोठं. 'सती' ही अशी स्त्री जी आपल्या जोडीदारासाठी,त्याच्या प्रेमासाठी देवाशीही लढून त्याचे प्राण परत घेऊन येणारी. आपल्या प्रेमासाठी संबंध जगाशी लढणारी. अगदी वटपौर्णिमेच्या दिवशी नव-याचं आयुष्य वाढावं,आरोग्य सुदृढ रहावं म्हणून वडाच्या झाडाभोवती धागा बांधून पूजा-उपवास करणं ही भारतीय परंपरा. त्यादिवशी प्रत्येक भारतीय स्त्री ही 'सती'च्या भूमिकेतच असते. भारतीय सिनेमांतही 'सती' च्या कथानकावर आधारित पौराणिक सिनेमे होऊन गेलेत. पण आता हॉलीवूडलाही 'सती'चं महात्म्य कळलं आणि लगोलग त्यांनी आपल्या हॉलीवूडपटात 'सती'नावाच्या भूमिकेचा समावेश केला.

आता आपल्या प्रत्येकाला हा प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे. अर्थात हॉलीवूडकरांनी याआधीच आपल्या ब-याच कथानकांमधनं भारताचं चित्र वेगवेगळ्या पद्धतीनं जगासमोर आणलाय. आपल्या कलाकारांनीही हॉलीवूडपटात काम करून भारताचा झेंडा अटकेपार नेलाय. पण आता चक्क 'सती' हे नाव वापरून भूमिका उभी केल्याने संबंध भारतीयांना हॉलीवूडने आश्चर्याचा धक्का नक्कीच दिला हे मात्र खरंय. वॉर्नर ब्रदर्सच्या 'मॅट्रिक्स रेसररेक्शन्स' या सिनेमात 'सती'नावाची भूमिका आहे जी आपल्या सर्वांची लाडकी प्रियंका चोप्रा साकारीत आहे. 'मॅट्रिक्स रेसररेक्शन्स'चा हा ४था भाग आहे. आतापर्यंत प्रियंका चोप्राच्या भूमिकेबद्दल खूप गुप्तता ठेवण्यात आली होती. पण अखेर हे गुपित उघड झालंच ते या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आलेल्या कोरियन पोस्टरमुळे. वॉर्नर ब्रदर्सनी इंग्लिश पोस्टरवर प्रियंकाच्या भूमिकेबद्दल काहीच उघड केलं नाही पण अखेर इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या कोरियन पोस्टरमुळे हे समोर आलं आणि प्रियंकाच्या 'सती' भूमिकेची सगळीकडेच चर्चा सुरू झाली. आपल्याकडे 'सती' या व्यक्तीरेखेकडे ज्यापद्धतीनं पाहिलं जातं तसंच प्रियंका साकारत असेलेल्या 'सती' भूमिकेचा ग्राफ आहे की काहीतरी वेगळं आहे अशाही चर्चा रंगू लागल्यात.

Priyanka Chopra-Jonas

मिस वर्ल्ड ते बॉलीवूडची सुपरस्टार असा प्रवास यशस्वी केल्यानंतर अभिनेत्री प्रियंका चोप्रा हॉलीवूडमध्ये आपलं नाव गाजवतेय. 'क्वांटिको' मधनं काम करून याआधीच प्रियंकाने हॉलीवूडमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. आता तर ती अमेरिकन सिंगर निक जोनसची पत्नी बनल्यानंतर अमेरीकेची रीतसर सून झालीय, त्यामुळे तर हॉलीवूड तिच्या अधिक जवळचं झालंय. उलट आता भारतीय सिनेमातनं ती अभावाने दिसते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'मॅट्रिक्स रेसररेक्शन्सच्या' कोरियन पोस्टरवर 'प्रियंका अॅज सती' हे उघडपणे लिहिल्याने हे सगळं कळून आलं. पण आता चर्चा सुरू आहे की हे चुकून घडलंय की जाणूनबुजून असं प्रमोशन केलंय यावरदेखील चर्चा सुरू झालीय. आणि भारताला अपेक्षीत सती प्रियंका साकारणार की भूमिकेचा ग्राफ आणखी वेगळा आहे यावर तर्क-वितर्क लावले जातायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Suzuki: मारुती सुझुकी इंडियाचे गुजरातमधील 'या' कंपनीसोबत विलीनीकरण होणार, एनसीएलटीकडून मोठी मान्यता

Mumbai News: मुंबईकरांना दिलासा वाहतूक कोंडीतून मिळणार! MMRDA ७० किमीचा भूमिगत बोगदा बांधणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Ranji Trophy, Video: ६,६,६,६,६,६,६,६.... सलग ८ षटकार अन् वेगवान अर्धशतक; २५ वर्षीय भारतीय फलंदाजाने घडवला इतिहास

Matoshree Drone: मातोश्रीवरून ड्रोन उडवल्याचे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे, ५ प्रश्न करत संशय व्यक्त केला, म्हणाले...

Shirur Crime : टाकळी हाजी येथे शेताच्या वादातून हल्ला; दोघे जखमी, लोखंडी गज व विटेचा वापर!

SCROLL FOR NEXT