Priyanka Chopra
Priyanka Chopra Google
मनोरंजन

वयाच्या २१ व्या वर्षी या गोष्टीमुळे प्रियंकाची मान लाजेनं खाली गेली

प्रणाली मोरे

प्रियंका चोप्रानं(Priyanka chopra) बॉलीवूडमध्ये जितकं नाव कमावलं तितकंच तिनं हॉलीवूडलाही आपल्या अभिनयानं दखल घ्यायला भाग पाडलं. आता नवरा अमेरिकन असला म्हणून काय झालं,त्याला भेटण्याच्या आधीपासूनच तिनं आपलं नाण हॉलीवूडमध्ये खणखणीत वाजवून दाखवण्यास सुरुवात केलीच होती. २००० साली 'मिस.वर्ल्ड' हा खिताब पटकावल्यानंतर प्रियंकानं बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आणि मग मागे वळून पाहिलं नाही. तिनं खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या अन् त्या करताना तिनं एक अभिनेत्री म्हणून परफेक्शनसाठी १०० टक्के दिले. त्यात कधी कधी बोल्डनेसची पातळी घसरली असेलही. पण फिल्मी बॅकग्राऊंडमधनं न आलेल्या प्रियंकाला वयाच्या २१ व्या वर्षी करिअरच्या अगदी सुरुवातीलाच केलेल्या एका सिनेमातील काही सीन्समुळे आईवडिलांसमोर मात्र लाजेनं मान खाली घालायची वेळ आली होती.

तो सिनेमा होता ऐतराज. ज्या सिनेमात अक्षय कुमार,करिना कपूरसोबत प्रियंका दिसली होती खलनायिकेच्या भूमिकेत. या सिनेमात तीनं एका बिझनेस वुमनची भूमिका केलीय. जी पैशासाठी आपल्यापेक्षा तिप्पट वयाच्या व्यक्तीशी लग्न करते पण त्यानंतर मात्र त्याच्यासोबतच्या सेक्शुअल लाइफसंदर्भात समाधानी नसलेली ती आपल्या जुन्या प्रियकरानं तो आनंद आपल्याला द्यावा म्हणून त्याच्यावर जबरदस्ती करते,त्याला रेपीस्ट ठरवायचा प्रयत्न करते. पण ही भूमिका साकारताना वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी तिला खूप बोल्ड सीन द्यावे लागले होते. पण सिनेमाच्या स्क्रीनिंगला जेव्हा तिचे आई-वडिल आले होते तेव्हा मात्र तिची मान लाजेनं खाली गेली होती. तिला वाटलं होतं या सिनेमानंतर आपलं सिनेमातलं काम थांबणार. आपल्याकडे लोकांचा पहायचा दृष्टिकोन वेगळा होईल. पण झालं उलटंच. प्रियंका म्हणाली,''सिनेमा संपला तेव्हा सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि सर्वांच्या नजरा माझ्याकडे होत्या. याचाच अर्थ सिनेमात माझ्यापेक्षा वरिष्ठ कलाकार असतानाही सगळ्यांनी माझ्या कामाचं कौतूक केलं होतं. माझ्यासाठी ती मोठी पावती होती. आणि माझ्या आईवडिलांनी तेव्हा सपोर्ट केला म्हणून आज मी एवढा लांबचा पल्ला गाठू शकले''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT