Producer Bhushan Kumar gifts Director Om Raut a Ferrari F8 Tributo supercar worth 4 crore for Adipurush  sakal
मनोरंजन

Om Raut: बाबो! 'आदिपुरुष'चा दिग्दर्शक ओम राऊतला आलं 4 कोटीचं गिफ्ट.. काय आहे असं?

'आदिपुरुष' या चित्रपटामुळे चर्चेत असलेला दिग्दर्शक ओम राऊत या अनोख्या गिफ्ट मुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

नीलेश अडसूळ

Adipurush director om raut: 'तान्हाजी' चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) हा सध्या त्याच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची सर्वजन आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटात काय वेगळं पाहायला मिळणार याची उत्कंठा सर्वांना होती. परंतु या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले. चित्रपटात वापरण्यात आलेले VFX आणि रावणाची भूमिका यावरून या चित्रपटाला खूप ट्रोल केलं गेलं. त्यामुळे ओं राऊत सध्या बराच चर्चेत आहे. पण आता त्याची चर्चा वेगळ्याच कारणामुळे सुरू झाली आहे. त्याला चक्क 4 कोटींचे गिफ्ट आहे आहे.

(Producer Bhushan Kumar gifts Director Om Raut a Ferrari F8 Tributo supercar worth 4 crore for Adipurush)

आदिपुरुष चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार (Bhushan Kumar) यांनी ओम राऊतला एक महागडी काल गिफ्ट केली आहे. या कारची किंमत जवळपास 4 कोटी आहे. ऐकून धक्का बसला असेल पण हे खरे आहे. भूषण कुमार यांनी ओम राऊतला भेट म्हणून दिलेली फेरारी ही गाडी दिली असून जवळपास 4.02 कोटी रुपये इतकी या गाडीची किंमत आहे. ही लाल रंगाची  Ferrari F8 Tributo भूषण कुमार यांच्या नावानं रजिस्टर्ड आहे. त्यामुळे भूषण यांनी त्यांच्या कलेक्शनमधील कार ओमला दिली आहे, असं म्हटलं जात आहे.  

ओम राऊतच्या आधी भूषण यांनी कार्तिक आर्यनलाही McLaren GT ही कार गिफ्ट म्हणून दिली होती. या कारची किंमत जवळपास 4.70 कोटी रुपये आहे. कार्तिक या कारचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता ओम राऊतलाही जवळपास चार कोटींची गाडी भेट दिल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहेत.

ओम राऊतचा 'आदिपुरुष' हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटात लोकप्रिय अभिनेता प्रभास रामाची भूमिका साकारणार आहे. तर कृती सेनन ही 'सीता' देवीची आणि सैफ अलि खान रावणाच्या भूमिकेत आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shakti Cyclone : अतिवृष्टीनंतर आणखी एक अस्मानी संकट! 'शक्ती' चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा...

Cheque Clearance Rule: आरबीआयचा मोठा निर्णय; आजपासून चेक लगेच क्लिअर होणार, बँकिंग सिस्टीममध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता; हवामानशास्त्र तज्ज्ञ डॉ. डाखोरे यांचा इशारा

AVN Disease: एव्हीएन प्रमुख कारण, अत्याधुनिक उपचारांनी सर्वसामान्य आयुष्य जगणे शक्य; तारुण्यातच ‘हिप जॉइंट रिप्लेसमेंट

Sangli Politics : शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का! आमदार पूत्र करणार भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT