pulkit samrat and varun sharma  Sakal
मनोरंजन

Varun-Pulkit: पुलकित सम्राटने वरुण शर्माला केले किस, यूजर्स म्हणाले- 'यांच्यात काहीतरी...'

सध्या वरुण शर्मा आणि पुलकित सम्राट यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aishwarya Musale

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रत्येक कृतीवर चाहते आणि मीडिया बारीक नजर ठेवतात. अनेकवेळा हे सेलेब्स नकळत असे काही करतात जे हेडलाईन्समध्ये येते. सध्या वरुण शर्मा आणि पुलकित सम्राट यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुलकितने वरुण शर्मासोबत असे काही केले की लोक हसणे थांबवू शकणार नाहीत. यूजर्स असेही म्हणत आहेत की या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे?

बॉलिवूड अभिनेता वरुण शर्मा आणि पुलकित सम्राट अलीकडेच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घराबाहेर स्पॉट झाले होते. यादरम्यान वरुण आणि पुलकित काळ्या आणि निळ्या डेनिममध्ये त्यांनी ट्विनिंग केली होती. इतकेच नाही तर दोघांनी मनीष मल्होत्राच्या घराबाहेर एकमेकांना मिठी मारली.

दरम्यान, वरुणच्या गालावर चुंबन घेण्याऐवजी पुलकितने चुकून त्याच्या ओठांवर चुंबन घेतले. मात्र, लवकरच आपली चूक सुधारत पुलकितने वरुणच्या गालावर किस केले. पण तोपर्यंत पुलकित आणि वरुणचे हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले होते आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि युजर्स मस्ती करताना जोरदार कमेंट करत आहेत.

Instagram

सोशल मीडियावर आतापर्यंत लाखो लोकांनी वरुण आणि पुलिकतचे व्हिडिओ लाईक केले आहेत. त्याचवेळी एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, हे काय होत आहे भाऊ. तर दुसऱ्याने लिहिले की, "आम्हाला पुलकितला दोस्ताना 2 मध्ये बघायचे आहे." तर दुसर्‍याने लिहिले, "या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे."

वरुण शर्मा आणि पुलकित सम्राट 'फुक्रे' पार्ट 1 आणि 2 मध्ये दिसले आहेत. आता ही जोडी 'फुक्रे 3' फ्रँचायझीच्या पुढच्या भागातही दिसणार आहे. 'फुक्रे 3' ची रिलीज डेट 7 सप्टेंबर 2023 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT