Puneet Superstar Fans Bring JioCinema Ratings To down bigg boss ott 2  SAKAL
मनोरंजन

Puneet Superstar: पुनितसोबतचा पंगा Jio Cinemas ला पडला महागात, Bigg Boss Ott 2 मधुन बाहेर हाकलताच...

आता पुनित सुपरस्टारला काढण्याचा परिणाम Jio Cinemas झाला आहे.

Devendra Jadhav

Bigg Boss Ott 2 सध्या चांगलंच चर्चेत आहे. Bigg Boss Ott 2 मधुन पहिल्याच आठवड्यात पुनित सुपरस्टारला बिग बॉसने घराबाहेर काढलं. पण आता याचा फटका आता Jio Cinemas ला पडलाय.

असं क्वचित घडलंय की, एका स्पर्धकाच्या जाण्याचा परिणाम चॅनलवर घडलाय. Bigg Boss Ott 2 हे Jio Cinemas या Ott वर सुरु आहे. त्यामुळे आता पुनित सुपरस्टारला काढण्याचा परिणाम Jio Cinemas झाला आहे.

(Puneet Superstar Fans Bring JioCinema Ratings To down bigg boss ott 2)

सोशल मीडिया Influencer पुनीत सुपरस्टार बिग बॉस ओटीटीमध्ये सामील झाला. पुनीत सुपरस्टारचे टेलिव्हिजनमधील पदार्पण होते.

विशेष म्हणजे पुनित सुरुवातीलाच बाद झाला. त्याला बिग बॉसच्या घरात पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. प्रेक्षकांनी जिओ सिनेमाच्या विरोधात पुनितला घरी परत पाठवण्यासाठी मोहीम सुरू केली.

लॉर्ड पुनीतचे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणे चाहत्यांना आवडले नाही. पुनीत सुपरस्टार घराबाहेर गेल्यानंतर काही दिवसांनी चाहत्यांनी जिओ सिनेमाचे रेटिंग कमी केले. ट्विटरवर अनेकांनी ट्विट केले.

यावरून लॉर्ड पुनीतच्या चाहत्यांची फॅन फॉलोईंग मोठी असल्याचे दिसून येते. यावरून असाही अंदाज लावला जाऊ शकतो की,

केवळ पुनीतला पाहण्यासाठी अनेकांनी बिग बॉस OTT पाहण्यास सुरुवात केली. पण आता पुनित गेल्यामुळे प्रेक्षकांनी Bigg Boss Ott 2 पाहणं कमी केलंय, असं दिसतंय.

बिग बॉसचा वाद आणि गरीबांमध्ये प्रसिद्ध

बिग बॉस ओटीटीमध्ये गैरवर्तन आणि बेशिस्तपणे वागल्याप्रकरणी त्याच्यावर मेकर्सनं कारवाई केली आहे. त्यामुळे पुनीतच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियावर ज्याचे लाखो चाहते आहेत अशा पुनीतला एकाएकी बिग बॉसमधून बाहेर पडावे लागल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र यासगळ्यात पुनीतनं देखील आपण काही कमी नाही हे सांगितले आहे.

त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे दिसून आले आहे. पुनीत हा भलेही त्याच्या अतरंगी वागण्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय असेल पण त्याची गरीबांप्रती असलेली सहानुभूती यामुळे तो प्रसिद्धीत राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT