Singer Gippy Grewal Esakal
मनोरंजन

Singer Gippy Grewal: पंजाबी गायकाच्या बंगल्यावर गोळीबार! लॉरेन्स बिश्नोई गँगने केला दावा

सलमान खानचे प्रमोशन करणे गिप्पीला पडले महागात!

Vaishali Patil

Singer Gippy Grewal: गेल्या अनेक दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई गँग दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगने आता आणखी एका गायकाच्या घरावर हल्ला केला आहे.

शनिवारी कॅनडातील व्हँकुव्हरमधील व्हाईट रॉक भागात प्रसिद्ध पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालच्या बंगल्यावर गोळीबार करण्यात आला. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्याची जबाबदारी घेतली आहे.

याआधीही गिप्पीला सतत धमक्या आल्या होत्या. तो सलमान खानचे प्रमोशन करत होता. त्याच्या अनेक पोस्टही व्हायरल झाल्या होत्या, ज्यामध्ये गिप्पीने सलमान खानला भाई म्हटले होते. गिप्पीला सलमान खानची प्रशंसा आणि प्रमोशन न करण्याचा इशारा बिश्नोई गँगने गिप्पीला दिला होता.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी हा गोळीबार केला असल्याचा दावा केला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये सलमान खान आणि सिद्धू मूसवाला यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

लॉरेन्स गँगची एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये असे लिहिले आहे की, सत् श्री अकाल राम राम सबनू, आज लॉरेन्स बिश्नोई गँगने व्हँकुव्हरच्या व्हाईट रॉक भागात गिप्पी ग्रेवालच्या बंगल्यावर गोळीबार केला आहे.

सलमान खानला तू खुप भाऊ- भाऊ म्हणत होतास आता तूझ्या भावाला तुला वाचवायला सांग. आणि तूझ्या भावाला सांग की, दाऊद तुला मदत करेल असा त्याचा भ्रम आहे, पण तुम्हाला आमच्यापासून कोणी वाचवू शकणार नाही.

तर पुढे या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, सिद्धू मूसवालाच्या मृत्यूनंतर तू खूप ओव्हरअॅक्टिंग करत आहेस. तो किती गर्विष्ठ व्यक्ती होता आणि कोणत्या गुन्हेगारी लोकांच्या संपर्कात होता हे तुला माहीत आहे.

मी आता तुला हा ट्रेलर दाखवला आहे, तर चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. कोणत्याही देशात पळून जा पण लक्षात ठेव मृत्यूला व्हिसा घ्यावा लागत नाही, त्याला पाहिजे तेथे यावे लागते.

गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील बंगल्यावर गोळीबार झाला असला तरी याप्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. तर गिप्पीने देखील यावर काही वक्तव्य केलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT