Punjabi Singer Ranjit Sidhu Suicide Esakal
मनोरंजन

Punjabi Singer Ranjit Sidhu Death: प्रसिद्ध पंजाबी गायकाने केली आत्महत्या! रेल्वे ट्रॅकजवळ सापडला मृतदेह

Vaishali Patil

Punjabi Singer Ranjit Sidhu Suicide: मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी लोकगायक रणजीत सिद्धू यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यासंबधित अधिक माहिती अशी की शुक्रवारी रात्री रेल्वे रुळाजवळ एक मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह रणजीत सिद्धूचा असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले

या संदर्भात माहिती देताना जीआरपीचे एसआय जगविंदर सिंग आणि जीआरपी नरदेव सिंग यांनी सांगितले की, रात्री रेल्वे रुळावरून एक मृतदेह सापडला होता जो ओळख पटवण्यासाठी जीआरपी चौकीत ठेवण्यात आला होता आणि आज त्याची ओळख पटली. तो रणजीत सिद्धू यांचा आहे.

रिपोर्टनुसार, रणजीत सिंहचे नातेवाईकांसोबत बरेच भांडण होत होते. याबाबत रणजीत सिद्धूच्या पत्नी सांगितले की, पतीचे नातेवाईकांशी भांडण सुरू होते.

त्यांचे नातेवाईक त्याला त्रास देत होते. त्यांचा सतत छळ करत होते. नातेवाइकांच्या जाचाला कंटाळून रणजितने आत्महत्या केली. काही काळापूर्वी त्यांनी मुलीचे लग्न केले होते. तेव्हापासूनच त्याचे नातेवाईकांशी भांडण होत होते.

यावेळी जीआरपीचे नरदेव सिंह यांनी सांगतिले की, या अंतर्गत अनेक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT