Sidhu Moosewala Latest Song
Sidhu Moosewala Latest Song esakal
मनोरंजन

Sidhu Moosewala Latest Song: मृत्युच्या 26 दिवसांनी SYL गाणं व्हायरल

युगंधर ताजणे

Sidhu Moosewala Latest Song : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्ध मुसेवाला याची निर्घुण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मनोरंजन विश्वात मोठी खळबळ (entertainment news) उडाली होती. सिद्धुच्या घटनेनंतर प्रख्यात गायक मिका सिंगला देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. बॉलीवूडचा भाईजान (salman khan) सलमान खान आणि त्याचे वडिल सलीम खान यांच्याही जीवाला धोका असल्याचे पत्र सोशल मीडीयावर व्हायरल झाले होते. मुंबई पोलिसांनी तातडीनं या घटनेचा तपास सुरु करुन दोषींवर कारवाई केली होती. लॉरेन्स बिष्णोई आणि त्याच्या काही साथीदारांना याप्रकरणात अटक करण्यात आली होती. (Sidhu Moosewala Latest Song)

आता सिद्धु मुसेवालाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी म्हणजे त्याचे नवे (bollywood news) गाणे त्याच्या मृत्युनंतर प्रदर्शित झाले आहे. सिद्धुनं काही गाण्यांचे गीतलेखन देखील केले होते. ती सर्व गीतं एकत्र करुन त्याचे एक गाणे व्हायरल करण्यात आले आहे. SYL असे त्या गाण्याचे नाव असून त्याला सोशल (bollywood actor) मीडियावर चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. काल हे गाणं व्हायरल झालं. त्यानंतर काही वेळातच त्याला प्रेक्षकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत डोक्यावर घेतले आहे. आतापर्यत 1 कोटी 30 लाखांपेक्षा अधिक लोकांनी त्या गाण्याला आपली पसंती दर्शवली आहे.

त्या गाण्यामध्ये पंजाबी पोलिसांविषयी भाष्य करण्यात आले आहे. त्यात कशाप्रकारे काहींना खोट्या केसमध्ये दाखल करण्यात आले. ज्यांनी पोलिसांच्या तपासाला विरोध केला त्यांच्याविरोधात प्रश्न विचारले त्या सर्वांना तुरुंगामध्ये टाकण्यात आले. यासगळ्याचा परामर्श त्या गाण्यामध्ये घेण्यात आला आहे. 29 मे रोजी पंजाबमध्ये सिद्धु मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स गँगस्टारनं घेतली होती.

सिद्धु मुसेवालाच्या गाण्यातून त्याच्या चाहत्यांना नेहमी एक वेगळा संदेश दिला जातो. ती त्याच्या गाण्याची वेगळी ओळख आहे. सध्या नव्यानं व्हायरल झालेल्या त्या गाण्यातून हरियाणा - पंजाबमधील चाहत्यांना एक नवीन संदेश देण्यात आला आहे. ते गाणं सतलज - यमुना लिंक कालवा याच्याशी संबंधित जो वाद सुरु आहे त्यावर या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. पंजाबमध्ये आम आदमीचे सरकार आल्यानंतर आता त्या पक्षानं हरियाणाच्या 2024 च्या निवडणूकीमध्ये सतलज - यमुना च्या कालव्याचे काम करुन ते पाणी हरियाणाला देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT