pushakar jog emotional post for daughter felisha viral on social media  SAKAL
मनोरंजन

Pushkar Jog: "कायदा जरी आपल्या विरुद्ध गेला तरीही", पुष्करने लेकीसाठी केलेली पोस्ट चर्चेत, काय घडलंय नेमकं?

पुष्कर जोगने लेकीसाठी भावूक पोस्ट केली आहे, ज्याची सध्या चर्चा आहे

Devendra Jadhav

Pushkar Jog News: पुष्कर जोग हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. जबरदस्त, वेल डन बेबी, व्हिक्टोरिया अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये पुष्करने उत्कृष्ट काम केलंय. पुष्करचा अलीकडेच बापमाणूस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळाली आहे. अशातच पुष्करने सोशल मिडीयावर एक पोस्ट केलीय. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

(pushakar jog emotional post for daughter felisha)

पुष्करने त्याची मुलगी फेलिशासोबतचा फोटो पोस्ट केलाय. त्या फोटोला कॅप्शन दिलंय की, मी तुझ्यासाठी जगतो.. तुझ्या प्रगतीसाठी मी काहीही करू शकतो.. मी जगलो किंवा नाही जगलो तरी.. मी तुला नेहमीच प्राधान्य देईन.

जगाच्या विरोधात असू दे, कायद्याच्या विरोधात असू दे, आपण जन्मजात फायटर आहोत. तुझा डॅडा सर्वात बलवान आहे.. तुझ्यासाठी सर्व फेलिशा.

अशी पोस्ट पुष्करने केलीय. पुष्करने अचानक मुलीसाठी केलेली ही पोस्ट बघून अचानक काय घडलंय असा अंदाज त्याचे चाहते बांधत आहेत.

पुष्करच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, पुष्कर अलीकडेच बापमाणूस या मराठी सिनेमात दिसला. या सिनेमात पुष्करने प्रमुख भूमिका साकारली. या सिनेमात पुष्करसोबत अनुषा दांडेकर असे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

पुष्करच्या आगामी प्रोजेक्टची माहिती उपलब्ध नसली तरीही त्याचे फॅन्स त्याच्या आगामी प्रोजेक्टची वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT