pushkar Shrotri in 36 gunn marathi movie as a counselor cast release date santosh juvekar sakal
मनोरंजन

Pushkar Shrotri: मोडलेला संसार जोडायला येतोय पुष्कर श्रोत्री! 'समुपदेशक'बनून..

आता अभिनेता नाही तर ‘समुपदेशक’ पुष्कर श्रोत्री म्हणून सांधणार विस्कटलेली नाती..

नीलेश अडसूळ

Pushkar Shrotri: अभिनेता पुष्कर श्रोत्री त्याच्या 'हॅप्पी गो लकी' स्वभामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो. मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हा अभिनेता आता ‘समुपदेशक’ म्हणून काम करणार आहे. गैरसमजामुळे विस्कटलेल्या नात्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याच्या कामासाठी पुष्करने पुढाकार घेतला आहे.

(pushkar Shrotri in 36 gunn marathi movie as a counselor cast release date santosh juvekar)

समुपदेशक म्हणून त्याची नवी इनिंग यशस्वी होते का? हे पाहण्यासाठी तुम्हाला आगामी ‘३६ गुण’ हा मराठी चित्रपट पहावा लागेल. या चित्रपटात तो समुपदेशकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुष्करचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना यात पहायला मिळेल. समित कक्कड दिग्दर्शित '३६ गुण' (36 gunn marathi movie)चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पुष्कर सांगतो की, ‘समुपदेशक’ सुसंवादासाठी प्रयत्न करतोच पण त्याच्या या प्रयत्नाला समोरच्याचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा असतो. कोणत्याही नात्यामध्ये मनं जुळायला हवीत. ती जुळली की, नात्याचा समतोल साधला जातो, हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. लग्न झालेल्या व न झालेल्या प्रत्येकाने हा चित्रपट पहायला हवा.

या चित्रपटात संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार मध्यवर्ती भूमिकेत असून त्यांच्यासोबत पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत. ‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित ‘३६ गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले-सहाय यांचे आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पतीने केला पत्नीचा खून

SCROLL FOR NEXT