'Pushpa 2' surpassed shahrukh khan 'pathan' and Salman Khan 'Tiger 3', become most awaited film. Google
मनोरंजन

Allu Arjun: सलमान,शाहरुखपेक्षा अल्लू अर्जूनचीच हवा, रिलीजआधीच 'पुष्पा 2' च्या कारनाम्याची रंगली चर्चा

शाहरुखचा 'पठाण',सलमानचा 'टायगर 3' आणि अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2' हे सिनेमे पुढील वर्षातच रिलीज होणार आहेत. त्यामुळे यांची एकमेकांशी तुलना आतापासूनच होऊ लागलीय.

प्रणाली मोरे

Allu Arjun: 2023 मध्ये सिनेमागृहात बडे सिनेमे रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. 'पुष्पा 2','पठाण', 'जवान,''टायगर 3',डंकी आणि या व्यतिरिक्त असे कितीतरी सिनेमांची नावं घेता येतील. पण अल्लू अर्जूननं म्हणे शाहरुख आणि सलमान खानला पाठी टाकलं आहे. तुम्हाला माहितीय का लोक कोणत्या हिंदी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर यासंदर्भात आमच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. ना सलमान खानचा 'टायगर 3', ना शाहरुखचा 'पठाण' तर लोक प्रतिक्षा करत आहेत ती अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2' ची. होय,एका सर्वेनुसार हे कळालं आहे की सर्वसामान्य पब्लिक अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2' पाहण्यासाठी आतुर आहेत.

सध्या अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2' च्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. रिपोर्टनुसार या सिनेमाचं शूटिंग येत्या काही दिवसांत सुरु होणार आहे. Ormax Media ने बहुप्रतिक्षित असलेल्या हिंदी सिनेमांचा एक सर्वे केला होता. 15 ऑक्टोबर पर्यंत अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा नंबर वन पदावर आहे असं दिसून आलं आहे. त्यानंतर शाहरुखचा 'पठाण'च्या प्रतिक्षेत लोक आहेत आणि तिसऱ्या नंबरवर सलमान खानचा 'टायगर 3' आहे. याव्यतिरिक्त चौथ्या आणि पाचव्या नंबरवर शाहरुखचा 'जवान' आणि 'डंकी' असल्याचं आढळून आलं आहे.

'पुष्पा-द रूल' विषयी बोलायचं झालं तर या सिनेमाचं दिग्दर्शन सुकुमार करत आहे. सिनेमात अल्लू अर्जुन , फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना लीड रोल मध्ये आहेत. सिनेमाचं शूटिंग अद्याप सुरु झालेलं नाही. रिपोर्टनुसार, हा सिनेमा ५ भाषांमध्ये पुढील वर्षी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

तर शाहरुख खानच्या 'पठाण' मध्ये दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम आपल्याला दिसणार आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. शाहरुख आपल्याला शेवटचा 2018 मध्ये 'झिरो' सिनेमात अनुष्का शर्मासोबत दिसला होता. तसंच, रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमातही तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. याव्यतिरिक्त शाहरुख खान 'जवान' सिनेमात साऊथची अभिनेत्री नयनतारासोबत लीडमध्ये दिसेल. शाहरुख खान राजकुमार हिरानीच्या 'डंकी' सिनेमातही काम करत आहे. या त्याच्या दोन्ही सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सलमान खानच्या टायगर ३ विषयी बोलायचं झालं तर यात कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. हा सिनेमा दिवाळीत 2023 मध्ये रिलीज केला जाणार आहे. या फ्रॅंचायजीचा हा तिसरा सिनेमा आहे. 2012 मध्ये 'एक था टायगर' हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' रिलीज करण्यात आला होता. आता 'टायगर 3 ' मध्ये सलमान आणि कतरिना पुन्हा एकदा अॅक्शन करताना दिसतील. या सिनेमात इम्रान हाश्मि आहे,जो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT