Pushpa 2 The Rule Allu Arjun New look Viral esakal
मनोरंजन

Pushpa 2 The Rule : पुष्पाच्या बोटात तीन अंगठ्या कशासाठी, काय आहे त्यामागील रहस्य?

त्या नव्या पोस्टरमध्ये अल्लु अर्जूनच्या बोटात तीन अंगठ्या दिसून येतात. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, त्याचा अर्थ नेमका काय?

युगंधर ताजणे

Pushpa 2 The Rule Allu Arjun New look Viral : प्रसिद्ध अभिनेता अल्लु अर्जूनचा दोन वर्षांपूर्वी पुष्पा द राईज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर चाहते अल्लुच्या नव्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. सध्या अल्लुच्या नव्या चित्रपटाचा तो लूक समोर आला असून त्यातील त्याच्या बोटातील अंगठ्या पाहून वेगवेगळ्या कमेंटस् समोर आल्या आहेत.

पुष्पा २ चे ते पोस्टर चर्चेचा विषय आहे. त्यात अल्लुनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशा तऱ्हेवाईक लूकमधून दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचे आहे असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले असून त्याचे सिक्रेट वेगवेगळ्या प्रकारे सांगितले जात आहे. त्या तीन अंगठ्यांचा नेमका अर्थ काय माहितीये?

Also Read - सारखी चक्कर येते? मग नका करु दुर्लक्ष...'हे' असू शकतं कारण!

ज्योतिषांनी काय सांगितलं?

त्या नव्या पोस्टरमध्ये अल्लु अर्जूनच्या बोटात तीन अंगठ्या दिसून येतात. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, त्याचा अर्थ नेमका काय आणि या तीन अंगठ्या कशासाठी, त्यातून पुष्पाला काय सांगायचे आहे, त्यानं रुबी-पन्ना ही अंगठी घातली आहे. तसेच करंगळीला नेलपेंटही केलं आहे. याविषयी अधिक माहिती देणारे वृत्त एनबीटीनं प्रसिद्ध केलं आहे. त्यात म्हटल्यानुसार ज्योतिषांनी याबाबत भाष्य केलं आहे.

माणिक, पन्ना हे दोन्ही एकत्रित परिधान केल्यामुळे सौभाग्याचे प्रतिक म्हणून त्याकडे पाहिले जाते. पुष्पानं आपल्या अनामिकेमध्ये नवरत्नची देखील अंगठी घातली आहे. त्याचा अर्थ आर्थिकदृट्या समृद्धी असा त्याचा अर्थ आहे. तसेच त्यानं तर्जनीमध्ये एक आयताकार सोन्याची अंगठी घातली आहे. त्याविषयी मात्र सिक्रेट कायम आहे. त्यामागे दिग्दर्शकाची काय भूमिका आहे हे स्पष्ट नाही. याशिवाय पुष्पाच्या हातात हिरे आणि सोन्याचे ब्रेसलेट देखील आहे.

पुष्पानं केला मोठा विक्रम....

पुष्पा द राईज विषयी सांगायचे झाल्यास त्यामध्ये अल्लु अर्जून मुख्य भूमिकेत होता. त्याला बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम केला होता. त्यावर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा तो चित्रपट होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. लाल चंदनाची तस्करी अन् त्याच्याशी संबंधित टोळी गुन्हेगारी याविषयावर हा चित्रपट आधारलेला होता. त्यात रश्मिका मंदानानं प्रमुख अभिनेत्री म्हणून भूमिका पार पाडली होती.

दोन वर्षांपूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये अल्लु अर्जूनचा बहुचर्चित पुष्पा द राईज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानं जगभरातून तीनशे कोटींची कमाई केली होती. आता त्याच्या दुसऱ्या पार्टची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. त्याचा दुसरा भाग पुढील वर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT