मनोरंजन

मल्टीप्लेक्स उद्योगात मोठी घडामोड; PVR आणि INOX यांचं होणार विलिनीकरण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : PVR आणि INOX या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. PVR Limited आणि INOX Leisure Limited या दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीमध्ये PVR आणि INOX च्या सर्व-स्टॉक एकत्रीकरणास मान्यता दिल्यानंतर ही विलीनीकरणाची घोषणा केली. अजय बिजली हे एकत्रित संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक असतील आणि संजीव कुमार यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली जाईल, असा निर्णयही घेण्यात आला.

INOX समुहाचे अध्यक्ष पवन कुमार जैन यांची मंडळाचे Non-Executive Chairman म्हणून नियुक्ती केली जाईल. सिद्धार्थ जैन यांची संयुक्त संस्थेमध्ये Non-Executive Non-Independent Director म्हणून नियुक्ती केली जाईल, असे दोन्ही कंपन्यांनी सांगितलं आहे. हे विलिनीकरण PVR, INOX चे शेअरहोल्डर्स, स्टॉक एक्स्चेंज, SEBI आणि अशा इतर नियामक मंजूरींच्या मान्यतेच्या अधीन राहून करण्यात आलं आहे.

PVR सध्या 73 शहरांमध्ये 181 प्रॉपर्टीजवर 871 स्क्रीन चालवते. तर दुसरीकडे INOX 72 शहरांमध्ये 160 प्रॉपर्टीजवर 675 स्क्रीन चालवते. या दोघांच्या विलीनीकरणानंतर आता 109 शहरांमधील 341 प्रॉपर्टीजमधील 1,546 स्क्रीन्ससह ही कंपनी भारतातील मल्टीप्लेक्स उद्योगातील सर्वात मोठी कंपनी बनेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: शुक्रादित्य राजयोगामुळे वृषभ राशीसह 5 राशींना मिळेल आदर अन् संपत्ती, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT