R Madhavan once revealed that he is attracted to the Bollywood actress Bipasha Basu Google
मनोरंजन

R Madhavan आणि बिपाशा बासू प्रकरण माहितीय? अभिनेत्यानं स्वतः केलं होतं कबूल

आर.माधवनने त्याच्या एका मुलाखतीत बिपाशा बासू विषयी मोठा गौप्यस्फोट केला होता.

प्रणाली मोरे

बिपाशा बासू(Bipasha Basu) आता तिच्या सिनेमांमुळे फार चर्चेत नसली तरी एक काळ होता जेव्हा केवळ तिचे चाहते नाहीत तर इंडस्ट्रीतीलही अनेकांना ती आवडायची, तिच्यासाठी अनेकजण झुरायचे. आता बिपाशानं देखील काही कमी प्रेमप्रकरणं केली नाहीत. अगदी डिनो मोरियापासून जॉन अब्राहम पर्यंत अनेकांना तिनं डेट केलंय. आता तिचं लग्न होऊन ती मॅरिड लाइफ एन्जॉय करत असली तरी तिच्याबाबतीत एक नवी गोष्ट भूतकाळातली समोर आलीय ज्यानं पुन्हा बिपाशाची चर्चा होऊ लागलीय अन् तिच्यासोबत 'ए ट्रु जंटलमन' म्हणून इंडस्ट्रीत ओळखल्या जाणाऱ्या (R Madhavan)आर माधवनच्या नावाचाही बोलबाला होताना दिसत आहे. म्हणे माधवनला बिपाशा आवडायची,त्यानं एकदा तसं बोलूनही दाखवलेलं. चला,जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे ते.(R Madhavan once revealed that he is attracted to the Bollywood actress Bipasha Basu)

आर माधवनने बिपाशासोबत 'जोडी ब्रेकर्स'मध्ये काम केलं आहे. त्यावेळी सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्यानं आपल्याला बिपाशा आवडायची असं म्हटलं होतं. ही मुलाखत २०१२ ची. तेव्हा आर.माधवन म्हणाला होता,''जेव्हा ऑनस्क्रीन दोन कलाकारांमध्ये म्हणजे एखादा अभिनेता-अभिनेत्रीमध्ये केमिस्ट्री दिसून येते तेव्हा समजून जायचं या दोघांमध्ये कुणीतरी एक दुसऱ्याकडे आकर्षित झाला आहे किंवा दोघंही एकमेकांकडे आकर्षित झाले आहेत. आणि तेव्हा माधवनच म्हणाला होता, हो, मी बिपाशाकडे आकर्षित झालोय. एक माणूस म्हणून ती मला भलतीच आवडली आहे. ती अप्रतिम आहे. जर तुमच्यात केमिस्ट्री जुळूनच आली नाही तर पडद्यावर रोमान्स करणं कठीण होऊन बसतं. ती खूपच सुंदर आहे,मोहक आहे. मला आधी कळायचं नाही की आमच्यात सेटवर एकत्र काम केल्यावर बॉन्डिंग कसं राहिल पण तिनं ती एवढी मोठी स्टार असल्याचं कधीच जाणवून दिलं नाही''.

माधवननं त्याच्या लग्नाचा २३ वा वाढदिवस नुकताच त्याची पत्नी सरिता बिर्जेसोबत सेलिब्रेट केला. त्याचे खूप सुंदर फॅमिली फोटोज त्यानं शेअर केले होते. आणि पोस्टला कॅप्शन देत लिहिले होते,''जशी वर्ष सरतायत तसं माझं तुझ्यावरचं प्रेम वाढतच चाललं आहे,प्रत्येक लग्नाच्या वाढदिवशी वाटतं हीच नवी सुरुवात आहे, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको''.

माधवननं आता दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग इंडस्ट्रीत सुरु केली आहे. त्याच्या 'रॉकेट्री' सिनेमाला कान्स मध्ये खूप सम्मान प्राप्त झाला पण बॉक्सऑफिसवरही प्रेक्षकांनी सिनेमा पाहून माधवनच्या नव्या इनिंगचे कौतूक केलेले दिसून आले. 'रॉकेट्री- द नांबी इफेक्ट' हा सिनेमा येत्या १ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. सिनेमात शाहरुख आणि सुरिया पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत पहायला मिळाले. हा सिनेमा हिंदी,तेलुगु,तामिळ, इंग्लिश,मल्याळम,कन्नड अशा सहा भाषांमध्ये रिलीज करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Prices : नव्या वर्षात सोने, चांदी आणखी वाढणार; व्यापाऱ्यांचा अंदाज, आठवड्यात १० हजार दर वाढला

CIDCO House: सिडकोची महागृहनिर्माण योजना जाहीर; अल्प उत्पन्न गटासाठी मोठा फायदा, लाभ कसा घेता येईल?

Video Viral: फुगे विकणारा स्वामी समर्थांची फ्रेम घेण्यासाठी सोन्याच्या दुकानात गेला; जवळ ११ रुपये… पुढे जे घडलं ते मन हेलावणारं

AI फोटो एडिटिंगचा नवा ट्रेंड! मुलींनो धुरंधरमधील Akshaye Khanna Style फोटो बनवायचा आहे? 'हे' प्रॉम्प्ट्स वापरा

Mobile : भारताचा पहिला टचस्क्रीन मोबाईल! एकदा चार्जिंग केल्यावर 15 दिवस चालणार, काय तुम्हाला माहितीये नाव? 'या' फोनने घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT