R Madhavan reacts after fan shares videos of Kolkata theatre stopping Rocketry: The Nambi Effect screening Google
मनोरंजन

'रॉकेट्री' च्या स्क्रीनिंग दरम्यान थिएटरात राडा, माधवनला करावं लागलं ट्वीट

अभिनेता आर.माधवनचा सिनेमा 'रॉकेट्री- द नांबी इफेक्ट' शी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड(bollywood) अभिनेता आर.माधवनचा(R Madhavan) सिनेमा 'रॉकेट्री- द नांबी इफेक्ट'(Rocketry: The Nambi Effect) शी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोलकाताच्या एका सिनेमागृहात काही लोक गोंधळ घालताना दिसत आहेत. कोलकाताच्या थिएटरमधला हा व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला गेला आहे. ज्याला आर माधवनने देखील शेअर केले आहे.(R Madhavan reacts after fan shares videos of Kolkata theatre stopping Rocketry: The Nambi Effect screening)

ट्वीटरवर एका माणसानं हा गोंधळ माजलेला थिएटरमधील व्हिडीओे शेअर केला आहे. आर.माधवन दिग्दर्शित 'रॉकेट्री' सिनेमा पाहण्यासाठी कोलकाताच्या थिएटरमध्ये काही लोक गेले होते. ते लोक या व्हिडीओत काहीतरी तक्रार करताना दिसत आहेत. ते तक्रार करत आहेत की,सिनेमाची वेळ होवून ४५ मिनिटं झाली तरी सिनेमा सुरु करायला उशीर का होतोय याची साधी अनाउंसमेंटही झाली नाही.

या व्हिडीओत लोक मॅनेजमेंट सदस्यांसमोर आरडा-ओरडा करताना दिसत आहेत. काही लोक बंगाली भाषेत तर काही लोक हिंदी भाषेत तक्रारी करत आहेत. त्या व्हिडीओ शूट करणाऱ्या नेटकऱ्याने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर प्रश्न विचारला आहे की,'सिनेमाला मध्येच का थांबवलं?'

याच व्हिडीओला आर.माधवनने देखील शेअर केले आहे आणि लोकांना शांत रहायचं आवाहन केलं. त्याने लिहिलं आहे,''काहीतरी महत्त्वाचं कारण असणार,म्हणून सिनेमा सुरु व्हायला उशीर होत असावा. कृपया,शांत रहा,आणि धीरानं,प्रेमानं घ्या असं माझं नम्र निवेदन आहे. शो लवकरच सुरू होईल''.

या व्हिडीओ क्लीपमध्ये पाहिलं की लक्षात येतं की थिएटरमध्ये गोंधळ घालणारे ते लोक आपले पैसे रिफंड मागत आहेत. तर थिएटरच्या मॅनेजमेंटचे अधिकारी बंगाली भाषेत बोलताना दिसत आहेत की,त्यांचा स्टाफ जवळच्या सिटी मॉलमधून महत्त्वाचे कार्ड खरेदी करण्यासाठी गेले आहेत. मात्र लोक काहीही ऐकायला तयार नाहीत आणि त्वरित आपले पैसे परत करण्याची मागणी करत आहेत. त्यानंतर थिएटरचा एक अधिकारी लोकांना बाहेर रांगेत उभे रहा म्हणजे रिफंड मिळेल असं सूचित करतो.

लोकांनी तक्रारीचा सूर ओढत व्हिडीओ पोस्ट केला आणि म्हणाले,'आइनॉक्सच्या चुकीमुळे आम्हाला सिनेमाचा क्लायमॅक्स पाहता आला नाही'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT