Radhe Maas son Harjinder Singh to make OTT debut with Randeep Hoodas Inspector Avinash  Esakal
मनोरंजन

Inspector Avinash: आता हेच व्हायचे होते राहिले बाकी! राधे माँ चा मुलगा होणार 'हिरो'

धर्मगुरू राधे माँ चा मुलगा हरजिंदर सिंग रणदीप हुड्डा यांच्या 'इन्स्पेक्टर अविनाश' या चित्रपटातून ओटीटी पदार्पण करत आहे. वेब सीरिजमध्ये तो एसटीएफच्या एका अधिकाऱ्याची भूमिका साकारतांना दिसणार आहे.

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा त्याच्या आगामी अॅक्शन ड्रामा सीरिज 'इन्स्पेक्टर अविनाश'मुळे चर्चेत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री उर्वशी रौतेला दिसणार आहे. 'इन्स्पेक्टर अविनाश'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

रणदीप हुड्डा स्टारर या मालिकेत साऊथ इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री इरा मोरे देखील आहे. मात्र त्याचबरोबर या वेबसिरिजमध्ये आणखी एक महत्वाचा चेहरा दिसणार आहे.

राधे माँ चा मुलगा हरजिंदर सिंग रणदीप हुड्डा याच्या 'इन्स्पेक्टर अविनाश' या चित्रपटातून ओटीटी पदार्पण करत आहे. वेब सीरिजमध्ये तो एसटीएफच्या एका अधिकाऱ्याची भूमिका साकारतांना दिसणार आहे.

जेव्हा हरजिंदर या सिरिजबद्दल म्हणाला की, 'इन्स्पेक्टर अविनाश ही एक अतिशय मनोरंजक आणि जास्त एपिसोड असलेली सिरिज आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे अभिनेत्याला प्रेक्षकांसोबत वेळ घालवायला वेळ मिळतो.

त्याच्या भुमिकेबद्दल सांगताना तर तो म्हणाला, मी एका तरुण आणि गतिमान STF अधिकाऱ्याची भूमिका करत आहे, ज्याची नुकतीच यूपीमधील वाढत्या गुन्हेगारी सिंडिकेटचा तपास करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. तो आपली क्षमता सिद्ध करण्याचा आणि विभागात छाप सोडण्याचा प्रयत्न करतो.

या सिरिजमध्ये तो रणदीपसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. त्यामुळे जेव्हा त्याला याबद्दल विचारण्यात आले त्यावेळी तो म्हणाला की, 'या मालिकेसाठी रणदीपसोबत काम करताना खूप आनंद झाला आहे. रणदीप सरांसारख्या उत्तम अभिनेत्यासोबत काम केल्यानं त्याच्या अनुभवाकडे आणि कामाकडे आकर्षित होण्याची संधी मिळाली.

रणदीप सरांव्यतिरिक्त, मालिकेतील उर्वरित कलाकार अभिनयाच्या कलेमध्ये परिपूर्ण आहेत आणि तुम्हाला खूप प्रेरणा देतात.'

हरजिंदर हा त्याच्या कारकिर्दीत आणखी नवनवीन भुमिका साकारण्यासाठी उत्सूक आहे. तो म्हणाला की, त्याला केवळ सेलिब्रिटी म्हणून नाही तर अभिनेता म्हणूनही पुढं जायचं आहे.

तो एका व्यावसायिक कुटुंबातुन येतो ज्याची अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक आहे आणि त्याच्या कुटुंबाने त्याला त्याचे ड्रिम फॉलो करायाचे असं शिकवलं आहे.

तो पुढे म्हणतो की, "जर मला अभिनयात चांगले जमले नाही तर मी कौटुंबिक व्यवसायात सामील होईन."

हरजिंदर सिंग 'ड्रीम गर्ल' आणि 'आय एम बनी' सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दिसला आहे. त्याची वेब सिरीज 'इन्स्पेक्टर अविनाश' 18 मे रोजी जिओ सिनेमावर रिलीज होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT