radhe salman khan  Tema esakal
मनोरंजन

Radhe : कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सलमानचा बहुप्रतिक्षित चित्रपट?

सलमानचा 'राधे' आज होतोय प्रदर्शित

स्वाती वेमूल

बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानचा Salman Khan बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' Radhe Your Most Wanted Bhai हा चित्रपट आज (१३ मे) प्रदर्शित होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. कोरोनाचं संकट आणि लॉकडाउनमुळे या चित्रपटाचं डिजिटल रिलीज होत आहे. भारतातील प्रेक्षकांना 'झीप्लेक्स' Zeeplex या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहण्यासाठी पे-पर-व्ह्यू म्हणजेच चित्रपटाच्या तिकिटाइतके पैसे भरावे लागणार आहेत. त्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रीप्शन घेण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हा चित्रपट डाऊनलोड करून पुन्हा पाहता येणार नाही. ज्या प्रेक्षकांना सलमानचा हा चित्रपट पुन्हा पाहायचा असेल, त्यांना पुन्हा पैसे भरून तो पाहायला मिळेल. (radhe your most wanted bhai film releasing today where and how you can watch it)

'राधे' परदेशातील अनेक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवाने केलं आहे. यामध्ये सलमान खानसोबतच दिशा पटानी, रणदीप हुडा, गौतम गुलाटी, जॅकी श्रॉफ, सिद्धार्थ जाधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटात सलमान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, जो मुंबईतील ड्रग तस्करीला संपवणार आहे.

हेही वाचा : दरवेळी ईदचीच 'कमिटमेंट' का? सलमानचं 'टॉप सिक्रेट'

अॅक्शन, कॉमेडी आणि गाण्यांचा तडका

'राधे' हा चित्रपट अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा, म्युझिक या सर्वांचा एक पॅकेज आहे. चित्रपटातील सलमानचा लूक हा 'वाँटेड' या चित्रपटातील लूकसारखाच आहे. मात्र याची कथा 'वाँटेड'पेक्षा पूर्ण वेगळी असणार आहे, असं सलमानने मुलाखतीत सांगितलं.

किती वाजता आणि कुठे प्रदर्शित होणार?

देशभरात शुक्रवारी (१४ मे) रोजी ईद साजरी होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच आज (१३ मे) दुपारी १२ वाजता सलमानचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतात झी5, झीप्लेक्स आणि झी वाहिनीवर पे-पर-व्ह्यू म्हणजेच तिकिटाइतके पैसे भरून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. यासाठी जवळपास तुम्हाला २४९ रुपये भरावे लागतील. याशिवाय हा चित्रपट इतर डीटीएच ऑपरेटर्स म्हणजेच डी२एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटलवरही उपलब्ध असेल.

सोबत झी5चं सबस्क्रीप्शन

चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना Zeeplex चा पर्याय निवडावा लागेल. त्यात चित्रपटासाठी ठरवलेले पैसे भरून तो पाहता येईल. त्याचसोबत ओटीटी झी5 ने हे स्पष्ट केलं आहे की जे प्रेक्षक झीप्लेक्सवर 'राधे'साठी पैसे भरतील त्यांना वर्षभराचा झी5चा सबस्क्रीप्शन ४९९ रुपयांत मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT