radhika apte  Team esakal
मनोरंजन

'मी बेडकासारखी दिसतेय, आणि तुम्ही' राधिकाचा फोटो व्हायरल

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे (radhika apte) ही तिच्या हटकेपणासाठी ओळखली जाते.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे (radhika apte) ही तिच्या हटकेपणासाठी ओळखली जाते. आपल्या परखड स्वभावासाठीही ती प्रख्यात आहे. जगभरात नावाजलेली राधिका ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या चित्रपटांचा आणि अभिनयाचा खास प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे केवळ बॉलीवूडच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये तिच्या नावाची चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर (netflix) तिचा एक चित्रपट आला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले. (radhika apte photoshoot in a single shirt goes viral on social media yst88)

राधिका सध्या तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिनं इंस्टावर एक फोटो व्हायरल केला आहे. त्या फोटोमध्ये ती एका बेडकाच्या शेजारी बसली आहे. त्या बेडकाप्रमाणे पोझ देऊन तिनं फोटो काढला आहे. तिनं तो फोटो सोशल मीडियावर शेयरही केला आहे. त्याला तिच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी तिला लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत. त्यात चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पॅडमॅनमध्ये राधिकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.2005 मध्ये राधिकानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं आपल्या अभिनयानं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

राधिकाचा पार्च नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो जगभरातील वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये चर्चिला गेला होता. सध्या राधिका तिच्या त्या बेडकासोबत काढलेल्या फोटोमुळे व्हायरल झाली आहे. तिनं त्या फोटोला कॅप्शन देताना असे लिहिले आहे की, प्रत्येकजण एखाद्या प्राण्यासारखा दिसतो. मी तर बेडकासारखी दिसते आहे. आणि तुम्ही, असा प्रश्न तिनं चाहत्यांना विचारला आहे. राधिकाच्या त्या फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT