Radhika Merchant Mehandi Ceremony photo viral social media  esakal
मनोरंजन

Radhika Merchant Mehndi Ceremony : अंबानींच्या धाकट्या सुनबाईची मेहंदी सोशल मीडियावर रंगली!

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानींच्या घरात सध्या धामधुम सुरु आहे. लग्नाची सगळी गडबड आहे.

सकाळ डिजिटल टीम

Radhika Merchant Mehandi Ceremony photo viral social media : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानींच्या घरात सध्या धामधुम सुरु आहे. लग्नाची सगळी गडबड आहे. गेल्या काही दिवसांपासून मुकेश आणि नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा लग्नसोहळा राधिका मर्चंटसोबत होणार आहे.

सध्या सोशल मीडियावर राधिकाच्या मेहंदीचे फोटो व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरील कमेंट्स हे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यापूर्वी देखील राधिका मर्चंट आणि अनंतच्या रोको सेरेमनीचे फोटो व्हायरल झाले होते. आता राधिकाच्या मेहंदीच्या फोटोंचे नेटकऱ्यांनी तोंड भरून कौतूक केले आहे.

रोको सेरेमनीमध्ये तर पूर्ण बॉलीवूड सहभागी झाले होते. त्याचे फोटो हा बऱ्याचकाळ सोशल मीडियावर चर्चेचा विषय होतो. आता त्यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनची अनेकांना उत्सुकता आहे. यापूर्वी राधिकाच्या व्हायरल झालेल्या फोटोंना नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स या खास चर्चेचा विषय आहे. तिनं गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावर राधिकाचा पिंक रंगाचा लेहंगा कौतूकाचा विषय आहे. त्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. तिच्या पोल्की चोकर नेकलेस, इयरिंग्स यांचे फोटो देखील खास आकर्षणचा विषय ठरताना दिसत आहे. पारंपारिक भारतीय वेशभुषा करत तिनं हातावर काढलेली मेहंदी आता नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत आहे.

राधिका ही मेहंदी सेरेमनीमध्ये घर मोरे परदेसियावर डान्स करताना दिसत आहे. राधिका शिवाय त्या कार्यक्रमामध्ये ईशा अंबानीचा लूक देखील भलताच सुंदर दिसतो आहे. राधिकाविषयी आणखी सांगायचे झाल्यास ती, एनकोर हेल्थकेयरचे सीइओ विरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. तर ती एक क्लासिकल डान्स असून तिनं आठ वर्षांपासून भरतनाट्यमचे धडे गिरवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT