Parineeti-Raghav Chadha Wedding  Esakal
मनोरंजन

Raghav Chadha Wedding Update: परिणीतीसाठी काय पण..! राघवचा लग्नासाठी आटापिटा! करावी लागली सर्जरी

Vaishali Patil

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा यांची जोडी सध्या चर्चेत आहे. एंगेजमेंट होण्यापूर्वीच हे दोघं चर्चेत होते. त्यांनी अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं होत त्यामुळे त्याच्या डेटिंगच्या अफवाही जोर धरु लागल्या हेत्या. या दोघांबाबत मीडियामध्ये बातम्या येऊ लागल्या होत्या.

अशा परिस्थितीत आता एंगेजमेंट चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे दोघंही राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधणार अशा चर्चाही सुरु झाल्या आहे. दरम्यान राघव चढ्ढाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राघव चढ्ढा त्याच्या नाकाच्या शस्त्रक्रियेबद्दल बोलतांना दिसतो. हा व्हिडिओ राघव आणि परिणीतीच्या एंगेजमेंटमध्ये सहभागी असलेल्या फोटोग्राफरने शेअर केला होता.

राघवने एंगेजमेंट होण्यापूर्वी एक शस्त्रक्रिया केली होती. आपला लूक परिपूर्ण बनवण्यासाठी राघवने त्याच्या चेहऱ्याची शस्त्रक्रिया करून घेतली. ही गोष्ट खुद्द आप नेत्याने एका व्हिडिओमध्ये मान्य केली आहे. मात्र, लग्नाच्या फोटोग्राफर्सनी शेअर केलेला हा व्हिडिओ आता डिलीट करण्यात आला आहे.

मात्र, आता इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओने खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत आपण फक्त बॉलिवुडकरांनीच त्यांचा लूक परफेक्ट बनवण्यासाठी शस्त्रक्रिया करताना पाहिले होते. पण राजकारणी असूनही राघव चढ्ढा यांनी आपल्या लूकवर फक्त परिणीतीसाठीच बदल केला असल्याच दिसत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राघव परिणीतीच्या कुटुंबीयांशी बोलताना दिसत आहे. राघव गमतीने म्हणाला की त्याचं नाक पुर्वी त्याच्या आईसारखं दिसत होतं, म्हणून त्याने आपल्या वडिलांसारखं दिसण्यासाठी नाकाची शस्त्रक्रिया केली होती.

या व्हिडिओमध्ये, एक महिला राघवला विचारते की त्याने स्वतःमध्ये बाहेरून काही बदल केला आहेत का. यावर राघव म्हणतो, 'होय मी नाकाची छोटी शस्त्रक्रिया केली आहे..पहिले ते माझ्या आईसारख दिसत होत मात्र आता मी ते माझ्या वडिलांसारखं केलं आहे.

मात्र, जेव्हा राघव त्याच्या नाकाच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगत होता तेव्हा परिणिती त्याला सावध करते आणि त्याला थांबवते. परिणीती म्हणते की आजूबाजूला कॅमेरे आहेत, त्याचे शब्द रेकॉर्ड केले जात आहेत.

हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. राघवच्या नाकाची शस्त्रक्रिया ऐकून अनेकांना धक्का बसला. हे खरं की खोटं याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देवु लागले आणि जेव्हा प्रकरण वाढले तेव्हा फोटोग्राफरने तो व्हिडिओ डिलिट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT