Rahat Fateh Ali Khan Statement esakal
मनोरंजन

Rahat Fateh Ali Khan Statement : भारतीय परदेशात जाऊन लग्न का करतात? पाकिस्तानी गायक राहत फतेहच्या उत्तरानं वाद!, 'त्यांना तर...

प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान हे गेल्या काही दिवसांपासून वादात (Rahat Fateh Ali Khan Controversial Statement) सापडल्याचे दिसत आहे.

युगंधर ताजणे

Rahat Fateh Ali Khan Says Indians Host Weddings : प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान हे गेल्या काही दिवसांपासून वादात (Rahat Fateh Ali Khan Controversial Statement) सापडल्याचे दिसत आहे. त्यांचे एक प्रकरण शांत होत नाही तोच ते पुन्हा नव्या वादानं लक्ष वेधून घेत आहे. (Latest Entertainment News) आता पुन्हा एकदा एका मुलाखतीमध्ये त्यांनी भारतीय सेलिब्रेटींना उद्देशुन केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

काही दिवसांपूर्वी राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एका बाटलीसाठी त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्याला बुटानं (Rahat Fateh Ali Khan Viral Video) मारहाण केली होती. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी राहत फतेह अली खान यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. पुन्हा आपण केलेल्या कृत्याची माफीही मागितली असे सांगून त्या प्रकरणावर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

मी त्या विद्यार्थ्याची माफी मागितली. त्यानंतर तो रडायला लागला. मी काय केले हे मला माहिती आहे. तो माझा विद्यार्थी आहे. मी त्याच्या शिक्षकाच्या भूमिकेत आहे त्यामुळे त्याचे चांगले आणि वाईट काय हे मला माहिती आहे. असेही राहत यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते. हा वाद शांत होत नाही तोच ते पुन्हा त्यांच्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राहत यांनी जे भारतीय सेलिब्रेटी परदेशात जाऊन लग्न करतात त्यांच्यावर निशाणा साधला आहे.याबाबत फ्री प्रेसनं वृत्त दिलं आहे.

राहत फतेह अली खान यांचे म्हणणे आहे की, भारतीय सेलिब्रेटी परदेशात जाऊन लग्न करतात या मागील मोठं कारण म्हणजे त्यांना पाकिस्तानी गायकांना त्यांच्या लग्नात बोलवायचे असते. राहत यांनी युट्युबर अदील असिफच्या पॉडकास्टवर दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भारतीय नेटकऱ्यांना राहत यांचे हे वक्तव्य आवडलेलं नाही. त्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

भारतीयांना असे वाटते की, आमच्यासारखे कलाकार जसे की, आतिफ अस्लम आणि अन्य कलाकार यांनी त्यांच्या लग्नामध्ये परफॉर्मन्स करावा. आम्हाला तर भारतात येण्याची परवानगी नाही म्हणून भारतीय भारताबाहेर लग्न करण्यास प्राधान्य देतात. असेही राहत यांनी म्हटले आहे. त्यांचे ते विधान चर्चेत आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : भारतात बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या 24 बांगलादेशी नागरिक ताब्यात, तृतीयपंथीयांची संख्या अधिक

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT