rahul deshpande shared video about his daughter renuka and nana patekar playing in farm
rahul deshpande shared video about his daughter renuka and nana patekar playing in farm sakal
मनोरंजन

नाना आजोबा! राहुल देशपांडेच्या लेकीसोबत बागडले नाना पाटेकर..

नीलेश अडसूळ

Rahul deshpande : आधी आपल्या गायनाने आणि मग 'मी वसंतराव' या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला गायक म्हणजे राहुल देशपांडे. नुकताच त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. हल्ली तो सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. त्याच्या आणि त्याच्या मुलीचे विडिओ देखील बरेच चर्चेत असतात. शिवाय त्याच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याबाबतही तो बरच काही पोस्ट करत असतो. मुलगी रेणुकासोबतचा एक छान विडिओ त्याने शेअर केला आहे. पण त्यामध्ये रेणुकासोबत चक्क तिचे नाना आजोबा म्हणजे नाना पाटेकर दिसत आहे. हा विडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे. (rahul deshpande shared video about his daughter renuka and nana patekar playing in farm)

राहुल देशपांडे आणि त्याची मुलगी यांच्या व्हिडिओ हा चाहत्यांच्या आवडीचा विषय झालेला आहे. त्यांचं एकत्र गाणं असो किंवा गमतीजमती यांची बरीच चर्चा आहे. राहुलने रेणुकाचा एक सुंदर व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये चिमुकल्या रेणुकाबरोबर तिचे नाना आजोबा म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आहेत.

हा व्हिडिओ नाना पाटेकर यांच्या शेतातील आहे. आपल्याला सर्वांना ठाऊक आहेच की नाना जेव्हा चित्रीकरण नसतं तेव्हा गावी जावून शेती करतात. त्यांच्या गावी राहुल देशपांडे याने भेट दिली होती. त्यावेळी हा विडिओ शूट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये रेणुका नाना पाटेकरांच्या मदतीनं एका मोठ्या झाडावर चढताना दिसत आहे. तिचा एक सवंगडी आधीपासूनच झाडावर बसलेला दिसत आहे. झाडावर चढणाऱ्या रेणुकाला नाना आजोबा सावकाश चढ असं सांगत, झाडावर कसं चढायचं हे सांगताना दिसत आहेत. रेणुका झाडावर बसल्यानंतर नाना म्हणतात की, 'मस्तच! हे बघा आमच्या झाडाला काय वेगवेगळी फळं आली आहेत.'

v

राहुल यांनी हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'साधेच पण विलोभनीय सुख... नाना आजोबा... सुख म्हणजे नक्की काय असतं!' असं म्हणत त्यानं नाना पाटेकरांना टॅग केलं आहे. राहुल यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरुन लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Results Live : छ. संभाजीनगरमधून जलील १० हजार मतांनी आघाडीवर

Loksabha Election Results 2024: "हा फक्त ट्रेलर...!" PM मोदी वाराणसीमध्ये ५ हजार मतांनी पिछाडीवर; जयराम रमेश यांचा गर्भित इशारा

India Lok Sabha Election Results Live : जादू काही सेंकदाची! भाजपला मोठा धक्का तर इंडिया इतक्या जागेवर आघाडीवर

Lok sabha nivadnuk nikal 2024 : काँग्रेसला अच्छे दिन! तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस तीन आकड्यांवर; इंडिया आघाडी अनपेक्षित यशाकडे

Lok Sabha Election Result: 400 पारचा नारा स्वप्नच? NDA च्या जागा होतायत कमी, इंडिया आघाडीची जोरदार टक्कर

SCROLL FOR NEXT