Rahul Mahajan Divorce with His Third Wife Natalya Ilina File For Divorce bollywood news SAKAL
मनोरंजन

Rahul Mahajan: राहुल महाजन आता तिसऱ्या बायकोलाही घटस्फोट देणार? लग्नाला झाली ४ वर्ष

राहुल आणि त्याची बायको नताल्या इलीना घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय

Devendra Jadhav

Rahul Mahajan Divorce News: विविध रिअॅलिटी शोमधुन प्रसिद्धी झोतात आलेला आणि विविध कारणांमुळे राहुल महाजन चर्चेत असतो. राहुल महाजनने लग्न करण्यासाठी राहुल दुल्हनिया ले जाएगा हा रिअॅलिटी शो सुद्धा आयोजित केला होता.

पण आता लग्नाच्या ४ वर्षानंतर राहुल घटस्फोट घेत असल्याच्या बातम्यांना उधाण आलंय. राहुल आणि त्याची बायको नताल्या इलीना घटस्फोट घेणार आहेत.

(Rahul Mahajan & His Third Wife Natalya Ilina File For Divorce)

राहुल आणि नताल्याचा घटस्फोट

अनेक रिअॅलिटी शोचा स्पर्धक राहिलेला राहुल महाजनने कझाकिस्तानची मॉडेल नताल्या इलिनासोबत लग्न केले होते. आता दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

'इटाईम'च्या वृत्तानुसार, चार वर्षे लग्न केल्यानंतर या जोडप्याने गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. आता एका सूत्राने याला दुजोरा दिला आहे. याआधी राहुल महाजनचे डिंपी गांगुलीशी लग्न झाले होते आणि त्याने तिच्यापासून घटस्फोटही घेतला होता.

राहुल आणि नताल्याच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु

राहुल आणि नताल्याच्या जवळच्या सूत्राने 'इटाईम्स'ला सांगितले की, 'सुरुवातीपासून दोघांमध्ये अनेक वाद होते. परंतु लग्न झालं असल्याने ते गप्प होते. परंतु गेल्या वर्षी ते वेगळे झाले आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या जोडप्याने गेल्या वर्षी कागदपत्रे दाखल केली होती, घटस्फोट झाला आहे की अद्याप प्रक्रिया सुरू आहे हे मात्र स्पष्ट नाही."

नताल्या ही राहुलची तिसरी पत्नी होती. यापूर्वी 2006-2008 मध्ये श्वेता सिंगसोबत आणि नंतर डिम्पी गांगुलीशी राहुलने लग्न केले होते. 'राहुल दुल्हनिया ले जायेगा' या रिअॅलिटी शोमध्ये राहुल आणि नताल्याची भेट झाली होती.

घटस्फोटानंतर राहुलची तब्येत बिघडली

राहुल महाजन यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, तिसर्‍या घटस्फोटानंतर राहुलची तब्येत ठीक नाही. घटस्फोटानंतर तो पूर्णपणे तुटला होता. तो आता बरा आहे. आयुष्य पुन्हा सुरळित करायचा प्रयत्न करतोय. गेल्या वर्षी राहुलची प्रकृती फारशी चांगली नव्हती.

आता त्याला प्रेम मिळेल अशी आशा आहे. त्‍याने त्‍याच्‍या भूतकाळातील अनुभवांमुळे त्‍याच्‍या वैयक्तिक आयुष्‍याबद्दल न बोलण्‍याचा निर्णय घेतला आहे.

राहुलचा घटस्फोट चर्चांवर खुलासा

याशिवाय राहुल महाजनने मात्र कोणताही अधिकृत खुलासा केला नाही. राहुल म्हणाला, "मला माझे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायचे आहे. मला कशावरही भाष्य करायला आवडणार नाही.

माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे यावर मी माझ्या मित्रांशी बोलतही नाही. नताल्या इलिनाने देखील यावर काहीही सांगितले नाही."

राहुल रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या अनेक सीझनमध्ये दिसलाय. याशिवाय तो नताल्यासोबत 'स्मार्ट जोडी'मध्ये शेवटचा दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT